टीव्ही अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर,नुकताच केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 10:05 AM2018-01-17T10:05:08+5:302018-01-17T15:35:08+5:30

2017च्या वर्षअखेरीस मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार विवाबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले.‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती त्यावेळी पाहायला ...

When the TV actor is going to move soon, he has recently done a lot | टीव्ही अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर,नुकताच केला साखरपुडा

टीव्ही अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर,नुकताच केला साखरपुडा

googlenewsNext
2017
च्या वर्षअखेरीस मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार विवाबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले.‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती त्यावेळी पाहायला मिळाली होती.आता अशीच काहीशी खुश खबर आणखीन एका अभिनेत्याने चाहत्यांना दिली आहे. 'नामकरण'मधील अभिनेता करम राजपालने नुकताच गर्लफ्रेंड शिवालिका ओबेरॉयसोबत साखरपुडा केला आहे.करमने त्याच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.फोटो शेअर करताना त्याने कॅप्शन दिले आहे.अगदी रोमँटिक अंदाजात करणने पहिल्यांदाच त्याच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. त्याचे चाहते हे ही खुश खबर ऐकुन त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.अनेकांसाठी करणची ही बातमी खुशखबर ठरली असवी.मात्र अनेक तरुणींची मनं या पोस्टमुळे दुखावली गेली असणार.कारण या तरुणींमध्ये करम हा फेव्हरेट आहे.'नामकरण' मालिकेत तो निगेटीव्ह भूमिका साकारत आहे.यापूर्वी करमने 'हमारी सास लीला', 'परिचय', 'क्या हुा तेरा वादा', 'रक्षक', 'नादान परिंदे', 'मेरे अंगने' सह इतर मालिकांमध्येही काम केले आहे.करम आणि शिवालिका खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Also Read:नामकरणमध्ये बरखा बिष्ट पुनरागमन करणार?

अभिनेत्री बरखा बिष्टने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.'प्यार के दो नाम... एक राधा एक श्याम','काव्यांजली','कसौटी जिंदगी की' यांसारख्या मालिकांमधील बरखाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.'नामकरण' या मालिकेत तिने आशा ही भूमिका साकारली होती.तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.बरखाने या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर या मालिकेच्या फॅन्सना प्रचंड दुःख झाले होते. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या शोमध्ये पुन्हा येण्यासाठी बरखाला नुकतेच विचारण्यात आले असल्याचे कळतेय.या मालिकेत विराफ पटेल आणि बरखाची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.पण कथानकाच्या गरजेमुळे मार्चमध्ये मालिकेत बरखाने साकारलेल्या आशा या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते.आता या मालिकेला नाट्‌यमय वळण मिळाले असून सध्या प्रेक्षकांना जेलमधील ट्रॅक पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे निर्माते बरखाच्या पुनरागमनाच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. 




Web Title: When the TV actor is going to move soon, he has recently done a lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.