व्हीआयपी दिसणार ​इंडियाज बेस्ट जुडवामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 10:07 AM2017-07-18T10:07:44+5:302017-07-18T15:37:44+5:30

इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात जुळ्यांमधील खास नाते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ...

VIP looking India's best twin | व्हीआयपी दिसणार ​इंडियाज बेस्ट जुडवामध्ये

व्हीआयपी दिसणार ​इंडियाज बेस्ट जुडवामध्ये

googlenewsNext
डियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात जुळ्यांमधील खास नाते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणवीर बोहरा करणार आहे. करणवीर नुकताच जुळ्या मुलींचा बाप बनला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा कार्यक्रम खूपच खास आहे. करणवीर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करतो याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमात आता करणवीरसोबत सहसूत्रसंचालक आपल्याला पाहायला मिळणार आहे. करणवीरसोबत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हीआयपी करणार आहे असे म्हटले जात आहे. व्हीआयपी हा आपल्या अचूक विनोदी टायमिंगसाठी आणि नकलांसाठी ओळखला जातो. त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. व्हीआयपीचे खरे नाव हे ईश्वरलाल पवार असून त्याने आजवर अनेक रिअॅलिटी शोद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कॉमेडी सर्कसमधील त्याच्या परफॉर्मन्सची नेहमीच चर्चा झाली होती. व्हीआयपीसोबतच या कार्यक्रमात विकल्प मेहतादेखील दिसणार आहे. व्हीआयपी आणि विकल्प या कार्यक्रमात अनुक्रमे कुदरत आणि करिष्मा अशा दोन व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या जुळ्या बहिणी पोट धरून हसायला लावणार यात काही शंकाच नाही.
व्हीआयपी या कार्यक्रमाद्वारे कित्येक दिवसानंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहे. याविषयी तो सांगतो, या कार्यक्रमाचा मी हिस्सा होत असल्याचा मला आनंद होत आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना हलकाफुलका विनोद पाहायला मिळणार आहे. मी साकारत असलेली भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी मी काही जुळ्या स्पर्धकांसोबत गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी खरे तर मी चांगलाच गोंधळात पडलो होतो. ते हुबेहुब एकमेकांसारखे दिसत असल्याने मला त्यांना ओळखणे कठीण जात होते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला मजा येईल अशी मला खात्री आहे. 

Also Read : करणवीर बोहरा करणार इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

Web Title: VIP looking India's best twin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.