वत्सल सेठ आणि इशिता दत्ता करणार या मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:46 PM2018-09-17T15:46:30+5:302018-09-17T15:47:40+5:30

हिरण्यपश्यपू आणि त्याचा भाऊ हिरण्याक्ष यांच्या पौराणिक कथेचे समकालीन रुपांतर करून कौन है या मालिकेचा नवीन भाग बनवण्यात आला आहे. कौन है?- खौफ का एक नया अध्याय अशी कौन है या मालिकेची नवीन टॅग लाईन असणार आहे. 

Vatsal seth and Ishita dutta in Kaun hai serial | वत्सल सेठ आणि इशिता दत्ता करणार या मालिकेत काम

वत्सल सेठ आणि इशिता दत्ता करणार या मालिकेत काम

googlenewsNext

कौन है या मालिकेत लवकरच आपल्याला इशिता दत्ता आणि वत्सल सेठ हे दाम्पत्य पाहायला मिळणार आहे. या दोघांचे नुकतेच लग्न झाले असून या मालिकेत ते दोघे एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हिरण्यपश्यपू आणि त्याचा भाऊ हिरण्याक्ष यांच्या पौराणिक कथेचे समकालीन रुपांतर करून कौन है या मालिकेचा नवीन भाग बनवण्यात आला आहे. कौन है?- खौफ का एक नया अध्याय अशी कौन है या मालिकेची नवीन टॅग लाईन असणार आहे. 

वत्सल आणि इशिताने रिश्तो का सौदागर - बाजीगर या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या आधी त्यांनी हा कार्यक्रम सुरू असताना एकमेकांसोबत डेट करणार नाही अशा करारावर सही केली होती. पण हा कार्यक्रम संपल्यावर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मागच्या वर्षी लग्न केले. आता दहा महिन्यांनंतर ते छोट्या पडद्यावर पुन्हा एकत्र आले आहेत. कौन है या मालिकेत काम करण्यासाठी ते दोघे अतिशय उत्सुक आहेत. या मालिकेत वत्सल सेठ यतिनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने या मालिकेत हिरण्याक्षाचा अवतार साकारला आहे. तो त्याची आई दिती सह रॉयल पॅलेसच्या खाली असणाऱ्या नरकाची दारे उघडायचा प्रयत्न करत असतात, कारण त्यातून मानवजात नाहीशी होण्याचा आणि आपल्याला माहीत असलेले जग नाहीसे होण्याचा धोका असतो तर दुसरीकडे इशिता वैष्णवीची भूमिका करत आहे जी एक साधी मुलगी आहे, पण तिला माहीत नाहीये की, ती एक आशीर्वाद किंवा शाप घेऊन जन्माला आली आहे. या मालिकेविषयी बोलताना इशिता सांगते, "वत्सल आणि मी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. यामुळे या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. मला स्वतःला भयपटांची खूप भीती वाटते. मी भयपट पाहू शकत नाही आणि पाहिलाच तर मला कोणातरी सोबत असावे लागते. भयपटात काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे." 

कौन है या मालिकेतील भूमिकेविषयी वत्सल सांगतो, "इशिता सोबत काम करण्याचा अनुभव नेहमी चांगलाच असतो. कौन है या मालिकेची कथा खूप चांगली असल्यामुळे या मालिकेची मला उत्सुकता लागली आहे. आम्ही चित्रीकरण करायला सुरुवात केली असून या मालिकेतील आमच्या दोघांच्या व्यक्तिरेखा एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. 


 

Web Title: Vatsal seth and Ishita dutta in Kaun hai serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kaun Heiकौन है