'तुझ्यात जीव रंगला' टीमने केरळमधील पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 11:30 AM2018-09-05T11:30:41+5:302018-09-05T11:32:01+5:30

कोल्हापूरच्या मातीत रंगलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली, पण या ६०० भागांच्या यशस्वी प्रवासाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी एक सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतील कलाकार, निर्माते यांनी हे पैसे केरळ रिलीफ फंडला देऊ केले आहेत.

tujhyat jeev rangala team donated money to Kerala flood victim | 'तुझ्यात जीव रंगला' टीमने केरळमधील पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत

'तुझ्यात जीव रंगला' टीमने केरळमधील पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत

googlenewsNext

अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी ५०० यशस्वी भागांचा टप्पा गाठला. या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे ही सगळी पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्त्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या मलिकने प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याने मैलाचा दगड पार पडला आहे.

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ही पात्रं आपल्यापैकीच एक असल्याचे त्यांना वाटू लागले आहे.

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देत आहे. सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय आणि त्या दोघांची जुगलबंदी प्रेक्षक खूप एन्जॉय करत आहेत. प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांच्या अखंड पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला आहे.

कोल्हापूरच्या मातीत रंगलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली, पण या ६०० भागांच्या यशस्वी प्रवासाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी एक सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतील कलाकार, निर्माते यांनी हे पैसे केरळ रिलीफ फंडला देऊ केले आहेत. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण देश धावून आला. प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत करत आहे. सरकारने मदतीचा हात पुढे केलाच, पण कलाकार देखील यामध्ये पुढे सरसावले. तुझ्यात जीव रंगलाच्या टीमने आनंद वेगळ्या पद्धतीत साजरा करत आणि सामाजिक भान राखत आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

Web Title: tujhyat jeev rangala team donated money to Kerala flood victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.