'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये प्रतिभावान स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 09:58 AM2018-01-29T09:58:06+5:302018-01-29T15:28:06+5:30

अतिशय गरीब परिस्थितीत डान्स हे एकच वेड मनात घेऊन, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या रणधुमाळीत सामील झालेला चेतन साळुंखे, विवेक ...

A talented competitor in 'Dance Maharashtra Dance' | 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये प्रतिभावान स्पर्धक

'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये प्रतिभावान स्पर्धक

googlenewsNext
िशय गरीब परिस्थितीत डान्स हे एकच वेड मनात घेऊन, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ च्या रणधुमाळीत सामील झालेला चेतन साळुंखे, विवेक कांबळे सारखे डान्सवेडे किंवा बिमसी संभाजी नगर शाळेतील किंवा वाय के ग्रुप मधील मुले असोत, हे सर्वच महाराष्ट्रातील अनेक डान्स वर प्रेम करणाऱ्या मुलांचं प्रतिनिधित्व करतात. आजही अनेक अशी मुलं आहेत ज्यांना केवळ पैसा अभावी स्वतःतील टॅलेंट मारावं लागत . त्यांना योग्य मंच मिळत नाही. पैसा हा मोठा आहेच पण त्याहून जास्त स्वतःची प्रतिभा मोठी असते. आज महाराष्ट्रातील कित्येक तरुण वेगवेगळ्या कलेत प्रतिभावान आहेत.आणि त्यामुळेच अनेक तरुणांसाठी झी युवा या वाहिनीने 'डान्स महाराष्ट्र डान्स'  हा मोठा मंच उभा केला आहे. या मंचावर श्रीमंत गरीब हे केवळ त्यांच्यातील प्रतिभेने ओळखले जातात. इथे कसलाच भेदभाव केला जात नाही. डान्स महाराष्ट्र डान्स' हे नवे पर्व झी युवावर या बुधवारी २४ जानेवारीपासून सुरु झालंय. हा मंच महाराष्ट्रातील ४ वर्षांवरील तमाम नृत्य प्रेमींसाठी खुला आहे आणि मुख्य म्हणजे त्यावर कसलेही बंधन नाही. यात एखादा डान्सर सोलो किंवा ग्रुपमध्ये आणि मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणू शकतो. त्यात महत्वाची गोष्ट ही आहे, या स्पर्धेत पुढे जायचं असेल तर, तुम्हाला उत्कट आणि आणि कल्पक डान्सर असणं गरजेचं आहे. त्यात सोलो, डुएट आणि ग्रुप असल्याकारणामुळे आम्ही स्पर्धकांची एकमेकांशी स्पर्धा करू शकत नाही. त्यांनी केलेले जुने नवे परफॉर्मन्स पाहून उत्तम डान्सरची निवड परीक्षक करणार आहोत. 

चेतन साळुंखे एक उत्तम डान्सर, घरातली परिस्थिती अत्यंत बेताची, आई घराघरामध्ये जाऊन भांडी घासते. त्याला बघवत नाही पण काय करणार. स्वतःच्या अंगभूत नृत्याच्या प्रतिभेपासून आयुष्यात उंच उठायचं आणि यशाच्या शिखरावर चढायचे. आईला होणारा त्रास दूर करायचा या इर्षेने पेटून चेतन डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात सहभागी झाला, ५००० ते ६००० स्पर्धकांतून निवडून शेवटच्या ५० स्पर्धकात त्याची निवड झाली. पहिल्या एपिसोडमध्येच त्याने स्वतःला एक उत्तम डान्सर म्हणून स्वतःची ओळख पटवून दिली. 

पुण्यातील विवेक कांबळे ची स्टोरी सुद्धा काही वेगळी नाही, घरात आई कमावती, घरून डान्स ला विरोध , पण काहीतरी करायची जिद्द विवेकला स्वस्थ बसू देत नव्हते . इंटरनेट वर डान्स च्या स्टेप्स पाहून पाहून तो डान्स सिखला. घरातून मदत होत नव्हती पण एक मित्र त्याच्या पाठीशी खंबीर पाने उभा राहिला आणि तो आज या मंचापर्यंत येऊन पोहोचला. 

बि एम सी आणि वायके ग्रुप अत्यंत मेहनतीने या मंचापर्यंत पोहोचले आहेत. आज त्यांना माहीत आहे हजारोंमधून त्यांची निवड झाली आहे, जर का त्यांनी हा झी युवा वरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ चा मंच जिंकला तर त्यांच्यावर आशेने पाहत असलेली इतर डान्सवेडी आणखी जोमाने मेहनत घेतील. 

ही आणि यांसारखी अनेक मुले अतिशय मेहनतीने स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. झी युवाने, महाराष्ट्रातून अतिशय प्रतिभावान डान्सवेडे ‘डान्स महाराष्ट्र डान्स' मध्ये निवडून आणले आहेत.

Web Title: A talented competitor in 'Dance Maharashtra Dance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.