​सुप्रिया शुक्ला झळकणार द कपिल शर्मा शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 09:44 AM2017-05-23T09:44:05+5:302017-05-23T15:14:05+5:30

सुप्रिया शुक्लाने वो रहेने वाली महलो की, तेरे लिये, पलको की छाव में, साहेब बिवी और बॉस यांसारख्या मालिकांमध्ये काम ...

Supriya Shukla will be seen in The Kapil Sharma Show | ​सुप्रिया शुक्ला झळकणार द कपिल शर्मा शोमध्ये

​सुप्रिया शुक्ला झळकणार द कपिल शर्मा शोमध्ये

googlenewsNext
प्रिया शुक्लाने वो रहेने वाली महलो की, तेरे लिये, पलको की छाव में, साहेब बिवी और बॉस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती कुमकुम भाग्य या मालिकेत झळकत आहे. लवकरच तिची द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात एंट्री होणार आहे. 
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेल्या वादामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून सुनील ग्रोव्हर द कपिल शर्मा शोचे चित्रीकरण करत नाहीये. कपिल आणि त्याची टीम सिडनीहून परतत असताना कपिलने विमानात सुनीलला शिवीगाळ केली होती आणि त्याच्यावर चप्पलदेखील उगारली होती. या घटनेनंतर सुनीलने कपिलपासून दूर राहाणेच पसंत केले आहे. सुनीलसोबत अली असगर आणि चंदन प्रभाकरदेखील या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत नाहीये. 
कार्यक्रमाचा टिआरपी ढासळ्यामुळे कपिलने सुमोना चक्रवर्ती आणि उपासना सिंग यांना देखील कार्यक्रमात पुन्हा बोलावले आहे. पण त्याचादेखील टिआरपीवर काहीही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे आता आणखी एक कलाकार प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
सुप्रिया शुक्ला या कार्यक्रमात एका युपीमध्ये राहाणाऱ्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही स्त्री कानपूरची असून ती नुकतीच मुंबईत राहायला आली असल्याचे दाखवण्यात येणार आहे. सुप्रिया कोणत्याही शोमध्ये पहिल्यांदाच एक विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहे. याविषयी सुप्रिया सांगते, मी काहीच दिवसांपूर्वी या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. मी पहिल्यांदाच विनोदी कार्यक्रमात काम करत असल्याने थोडीशी घाबरली होती. पण कपिल आणि त्याच्या टीमने मला सांभाळून घेतले. मी कानपूरची रहिवाशी असल्याचे दाखवल्यामुळे तेथील भाषेचा लहेचा माझ्या संवादात यावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. कार्यक्रमाचे लेखक देखील मला यासाठी मदत करत आहेत. 

Web Title: Supriya Shukla will be seen in The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.