​सौम्या टंडन म्हणतेय मी भाभीजी घर पर है मालिका सोडलेली नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2017 09:20 AM2017-04-10T09:20:54+5:302017-04-10T14:50:54+5:30

भाभीजी घर पर है या मालिकेत सौम्या टंडन अनिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत ...

Saumya Tandon says that I have not left the series at sister-in-law's house | ​सौम्या टंडन म्हणतेय मी भाभीजी घर पर है मालिका सोडलेली नाहीये

​सौम्या टंडन म्हणतेय मी भाभीजी घर पर है मालिका सोडलेली नाहीये

googlenewsNext
भीजी घर पर है या मालिकेत सौम्या टंडन अनिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पण अनिता या भूमिकेत काहीही दम उरला नसल्याने सौम्या ही मालिका सोडणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी सौम्याने एक ट्वीट केले होते आणि या ट्वीटमध्ये तिने म्हटले होते की, भाभीजी ही एक खूपच चांगली मालिका आहे. या मालिकेच्या टीमसोबत काम करायला मला खूपच मजा येतेय. गोरीमेम या व्यक्तिरेखेवर तुम्ही नेहमीच प्रेम करत राहा. या तिच्या ट्वीटनंतर ती मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ही मालिका मी सोडत नाहीये असे ट्वीट तिने केले आहे.
सौम्या टंडनने याबाबत एक ट्वीट केले आहे. तिने म्हटले आहे की, कोणत्याही गोष्टीच्या निष्कर्षाला पोहोचू नका. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत. मी भाभीजी घर पर है या मालिकेचेच चित्रीकरण करत आहे.
या मालिकेत शिल्पा शिंदे अंगुरा भाभीची व्यक्तिरेखा साकारत होती. या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. पण निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिने या मालिकेला रामराम ठोकला आणि तिची जागा शुभांगी अत्रेने घेतली. शुभांगीने भाभाजी या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिल्यामुळे प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत स्वीकारले. त्यामुळे शिल्पाच्या जाण्याने मालिकेवर तितकासा परिणाम झाला नाही. पण आता शिल्पानंतर सौम्या टंडनदेखील ही मालिका सोडणार असल्याची बातमी आल्यामुळे या मालिकेच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. 

Web Title: Saumya Tandon says that I have not left the series at sister-in-law's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.