चला हवा येऊ द्या मध्ये येणार सिम्बाची टीम, रणवीर सिंगच्या डान्सचा पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 03:19 PM2018-12-19T15:19:35+5:302018-12-19T15:25:36+5:30

आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे आता सिम्बा या चित्रपटाची टीम या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.

Ranveer Singh and team will promote simba movie in chala hava yeu dya | चला हवा येऊ द्या मध्ये येणार सिम्बाची टीम, रणवीर सिंगच्या डान्सचा पाहा हा व्हिडिओ

चला हवा येऊ द्या मध्ये येणार सिम्बाची टीम, रणवीर सिंगच्या डान्सचा पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देझी मराठीच्या फेसबुक पेजवरून दोन व्हिडिओ पोस्ट करत त्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या एका व्हिडिओत रणवीर रामलीला सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहे.दुसऱ्या व्हिडिओत पद्मावत सिनेमातील हबीबी आणि सिम्बा सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबतच लवकरच भेटूया सिम्बाला थुरकटवाडीत असे लिहिण्यात आले आहे. 

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मराठी इंडस्ट्रीलीच नव्हे तर बॉलिवूडला देखील भुरळ घातली आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या कार्यक्रमातील निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील या कार्यक्रमाचे फॅन आहेत. झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर आजवर अनेक सेलिब्रिटी आले आहेत. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, श्रीदेवी, अनुष्का शर्मा, काजोल, अजय देवगण, अक्षय कुमार, गोविंदा, अनुष्का शर्मा, कंगना रणौत यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी आजवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. तसेच भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनी देखील या कार्यक्रमात येऊन धमाल मस्ती केली होती. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे आता सिम्बा या चित्रपटाची टीम या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. झी मराठीच्या फेसबुक पेजवरून दोन व्हिडिओ पोस्ट करत त्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या एका व्हिडिओत रणवीर रामलीला सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओत पद्मावत सिनेमातील हबीबी आणि सिम्बा सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबतच लवकरच भेटूया सिम्बाला थुरकटवाडीत असे लिहिण्यात आले आहे. 

 

सिम्बा या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत सिद्धार्थ जाधव, वैदही परशुराम, अरुण नलावडे यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे हे कलाकार देखील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात झळकणार असे म्हटले जात आहे. 

Web Title: Ranveer Singh and team will promote simba movie in chala hava yeu dya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.