‘दिल तो हॅपी है जी’मध्ये जस्मिन भसिनचे आऊटफिट डिझाईन करणार हा व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 02:38 PM2019-01-16T14:38:09+5:302019-01-16T14:43:31+5:30

'दिल तो हॅपी है जी' मालिकेची निर्मिती इश्कबाज व कुल्फी कुमार बाजेवालाचे निर्माते गुल खान करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये जास्मीन बबली गर्लच्या रोलमध्ये दिसत आहेत.

The person who will design Jasmine Bhasin's outfit in 'Dil To Happy Hai Ji' | ‘दिल तो हॅपी है जी’मध्ये जस्मिन भसिनचे आऊटफिट डिझाईन करणार हा व्यक्ती

‘दिल तो हॅपी है जी’मध्ये जस्मिन भसिनचे आऊटफिट डिझाईन करणार हा व्यक्ती

googlenewsNext
ठळक मुद्दे'दिल तो हॅपी है जी' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाजस्मिन भसिन दिसणार पंजाबी मुलीच्या भूमिकेत

नावाजलेल्या डिझायनर रितु कुमार त्यांच्या पारंपारिक पोशाखांसाठी खास मानल्या जातात. स्टार प्लसवरील नवीन दैनंदिन मालिका ‘दिल तो हॅपी है जी’ साठी जस्मिन भसिनच्या पोशाखांच्या डिझायनिंगसाठी त्यांना आणण्यात आले आहे. नायिका हॅपी मेहरा जस्मिन भसिन या मालिकेत डिजायनर पोशाख परिधान करताना दिसेल. पहिल्या काही भागांमध्ये मेहरा परिवारात लग्न दिसून येणार आहे आणि त्यासाठी हे खास पोशाख असतील. 

‘दिल तो हॅपी है जी’ मालिकेत अरूणा इराणी, बॉबी परवेझ, सत्यजित शर्मा, जस्मिन भसिन, अरू वर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जबरदस्त सेट्‌स आणि उत्तम कथानकासह या मालिकेच्या निर्मात्यांनी कलाकारांना उत्तम पोशाख प्रदान करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नाही.

'दिल तो हॅपी है जी' मालिकेची निर्मिती इश्कबाज व कुल्फी कुमार बाजेवालाचे निर्माते गुल खान करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये जास्मीन बबली गर्लच्या रोलमध्ये दिसत आहेत. यापूर्वी जस्मिन कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका दिल से दिल तकमध्ये टेनीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. आता ती हॅपीच्या भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडते का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 'दिल तो हॅपी है जी' १५ जानेवारीपासून संध्याकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्लसवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: The person who will design Jasmine Bhasin's outfit in 'Dil To Happy Hai Ji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.