नियती फटनानी 'हा' सीन देताना झाली नर्व्हस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:17 PM2018-08-16T16:17:49+5:302018-08-16T16:30:34+5:30

अभिनेत्री नियती फटनानी सध्या स्टारप्लसवरील 'नजर'मध्ये पिया ह्या साध्या आणि शांत मुलीची भूमिका साकारत आहे, जी लहान गावातील असल्यामुळे अनेक गोष्टी तिला ठाऊक नसतात.

Niyati Fatnani uncomfortable while shooting this scene | नियती फटनानी 'हा' सीन देताना झाली नर्व्हस

नियती फटनानी 'हा' सीन देताना झाली नर्व्हस

googlenewsNext
ठळक मुद्दे नियती फटनानी नजर'मध्ये पिया नावाची भूमिका साकारतेयआपल्या आईच्या शोधासाठी ती मुंबई येते.

अभिनेत्री नियती फटनानी सध्या स्टारप्लसवरील 'नजर'मध्ये पिया एका शांत मुलीची भूमिका साकारत आहे, जी लहान गावातील असल्यामुळे अनेक गोष्टी तिला ठाऊक नसतात. ती गोष्टींकडे अगदी थेटपणे पाहते आणि मुंबईला आपल्या आईच्या शोधात येते. आपल्या व्यक्तिरेखेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही ती सरळमार्गी आणि विनम्र स्वभावाची आहे.

आगामी भागामध्ये नियती तिचा ह्या मालिकेतील नायक हर्ष राजपुत (अंश राठोड) सोबत एका दृश्यात रोमांन्स करताना दिसणार आहे. हे चित्रीकरण करताना नियतीला जरा अवघडल्यासारखे वाटले. ती म्हणाली, “मी तशी शांत स्वभावाची आहे आणि असा प्रकारच्या भूमिका साकारताना मला अवघडल्यासारखे वाटते. हर्षसोबत हा माझा पहिलाच रोमाँटिक सीन होता आणि तशी मी त्याच्यासोबत कम्फर्टेबल असले तरी चित्रीकरण करताना मात्र मी नर्व्हस होते. पण अर्थातच माझी मानसिक स्थिती मला चित्रीकरणात दिसू द्यायची नव्हती. मी माझे दिग्दर्शक आणि हर्षसोबत चित्रीकरणाआधी बोलले आणि त्यांना माझ्या मानसिकतेबद्दल सांगितले. त्यानंतर मात्र मी सरळ चित्रीकरण केले.”

'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. या शहरात राहणाऱ्या राठोड परिवाराच्या अनेक पिढ्यांवर एका डायनची वाईट नजर पडलेली असते आणि त्यामुळे त्यांचे जीवन कसे संकटमय होते, त्याची ही कथा आहे. 'नजर' या मालिकेत  रितू सेठ सोबतच मोनालिसा, स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Niyati Fatnani uncomfortable while shooting this scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nazarनजर