निशांतसिंह मलकानीला अभिनया व्यतिरिक्त आवड या गोष्टीची!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:38 PM2019-04-23T16:38:14+5:302019-04-23T16:43:02+5:30

आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात.

Nishant Malkani Hidden Talent | निशांतसिंह मलकानीला अभिनया व्यतिरिक्त आवड या गोष्टीची!

निशांतसिंह मलकानीला अभिनया व्यतिरिक्त आवड या गोष्टीची!

googlenewsNext

कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या  आवडी-निवडी जपण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कला जपताना दिसतात.आवडत्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे निशांतसिंह. एक कसलेला अभिनेतासह तो एक उत्तम चित्रकारही आहे, ही गोष्ट फारच थोड्यांना ठाऊक असेल.  

या मालिकेतील एका भावनाप्रधान प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी निशांत सिंहमधील या आजवर गुप्त असलेली कलागुण सर्वांसमोर उघड झाली, तेव्हा त्याची कला पाहून सर्व कलाकार थक्क झाले होते. या प्रसंगात गुड्डन (कनिका मान) आणि त्याच्यातील संबंध एका चित्राद्वारे तो स्पष्ट करतो, अशी संकल्पना होती. यावेळी हे चित्र आपणच काढू, असे त्याने सांगितले आणि सर्वांना चकित केले.

आपल्या या चित्रकारितेच्या प्रसंगाबद्दल निशांत सिंह म्हणाला, “या प्रसंगात अक्षत जिंदाल गुड्डनला समजावतो की सर्व संबंधांची सुरुवात मैत्रीच्या नात्याने होते. मला जेव्हा हा प्रसंग समजावून सांगण्यात आला, तेव्हा त्यात मी एक चित्र काढतो, असं सुचवण्यात आलं होतं. ते ऐकून मी मनातल्या मनात सुखावलो कारण मला चित्र काढायला फार आवडतात. मी शाळेत असताना अनेक आंतरशालेय चित्रकला स्पर्धांमध्ये मी बक्षिसं मिळविली आहेत. लहानपणी मला चित्र काढायला फार आवडायची. या प्रसंगाच्या चित्रीकरणामुळे मला पुन्हा एकदा माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी काढलेल्या त्या छोट्या रेखाचित्राने सेटवरचे सर्वजण एकदम खुश झाले होते. ”

Web Title: Nishant Malkani Hidden Talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.