तुला पाहते रे या मालिकेत ईशा निरपराध असल्याचे होणार का सिद्ध?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:40 PM2018-11-15T15:40:33+5:302018-11-15T15:44:48+5:30

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, मायरा आणि झेंडे इशाला सरंजामे इंडस्ट्रीज मधून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर फ्रॉड केल्याचा आळ आणतात आणि तिला टर्मिनेशन लेटर देतात. ईशाला तिची बाजू मांडण्याची एकही संधी दिली जात नाही. इशा स्वतःला निरपराध सिद्ध करते का हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

New twist in subodh bhave and gayatri datar starter Tula pahate re | तुला पाहते रे या मालिकेत ईशा निरपराध असल्याचे होणार का सिद्ध?

तुला पाहते रे या मालिकेत ईशा निरपराध असल्याचे होणार का सिद्ध?

googlenewsNext
ठळक मुद्देइशाच्या बाबतीत झालेला सर्व प्रकार जाणून घेऊन विक्रांत स्वतः ईशाची उलट तपासणी करायचा निर्णय घेतो आणि त्या उलट तपासणीमध्ये त्याला आढळून येतं की, या फ्रॉडच्या मागे इशा नसून मायरा आहे.आता विक्रांत तिला जाब तर विचारणारच आहे... पण इतकी एफिशिएंट एम्प्लॉयी असलेली मायरा असं काही करेल हे विक्रांतला वाटलं नव्हतं णूनच विक्रांत तिला कामावरून काढून टाकणार की, तिला तिची चूक सुधारायची अजून एक संधी देणार हे पाहणं रंजक ठरेल.

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी.चे उच्चांक गाठत आहे. या मालिकेद्वारे सुबोध भावेला त्याच्या फॅन्सना एका हटके भूमिकेत पाहायला मिळत आहे आणि त्याची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे.

आजकाल मालिकांमध्ये नायिके इतकेच महत्व खलनायिकांना प्राप्त झालंय. खलनायिकेला देखील तितकीच लोकप्रियता मिळतेय. विक्रांत आणि ईशा व्यतिरिक्त या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेत दिसणारी मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे ही देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. मायरा आणि झेंडे यांना इशा आवडत नसून तिला खाली खेचण्यासाठी ते दोघेही अतोनात प्रयत्न करत आहेत, पण त्यांना त्यात यश मिळत नाहीये. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, मायरा आणि झेंडे इशाला सरंजामे इंडस्ट्रीज मधून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर फ्रॉड केल्याचा आळ आणतात आणि तिला टर्मिनेशन लेटर देतात. ईशाला तिची बाजू मांडण्याची एकही संधी दिली जात नाही. पण ईशाला ऑफिसमधून बाहेर काढणार इतक्यातच विक्रांत ऑफिसमध्ये येतो. झालेला सर्व प्रकार जाणून घेऊन विक्रांत स्वतः ईशाची उलट तपासणी करायचा निर्णय घेतो आणि त्या उलट तपासणीमध्ये त्याला आढळून येतं की, या फ्रॉडच्या मागे इशा नसून मायरा आहे.

आता विक्रांत तिला जाब तर विचारणारच आहे... पण इतकी एफिशिएंट एम्प्लॉयी असलेली मायरा असं काही करेल हे विक्रांतला वाटलं नव्हतं आणि म्हणूनच विक्रांत तिला कामावरून काढून टाकणार की, तिला तिची चूक सुधारायची अजून एक संधी देणार हे पाहणं रंजक ठरेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना तुला पाहते रे या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. 

Web Title: New twist in subodh bhave and gayatri datar starter Tula pahate re

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.