नजरमध्ये मोनालिसा साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 12:56 PM2018-07-20T12:56:23+5:302018-07-20T13:08:38+5:30

‘नजर’ या आगामी मालिकेत चेटकीणीची ही कथा आधुनिक भारतात- नव्हे, मुंबईसारख्या अत्यंत गजबजलेल्या महानगरात आणून ठेवली आहे.

Mona Lisa will play 'This' role in the nazar | नजरमध्ये मोनालिसा साकारणार 'ही' भूमिका

नजरमध्ये मोनालिसा साकारणार 'ही' भूमिका

googlenewsNext

काही अमानवी शक्तींमध्ये आपल्या सर्वांच्या मनात भीतीचे स्थान निर्माण केलेल्या ‘चेटकीणी’चा आणि तिच्या वाईट नजरेचा समावेश होतो. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘नजर’ या आगामी मालिकेत चेटकीणीची ही कथा आधुनिक भारतात- नव्हे, मुंबईसारख्या अत्यंत गजबजलेल्या महानगरात आणून ठेवली आहे. मोहना नावाच्या या रूपसुंदर चेटकीणीची भूमिका मोनालिसा ही भोजपुरी अभिनेत्री साकारीत असून चेटकीणीच्या रूपात ती टीव्हीवरील आजवरची सर्वात शक्तिशाली आणि भीतीदयक खलनायिका बनणार आहे.

मोनालिसा म्हणाली, “हिंदी मालिकांमध्ये मी या मालिकेद्वारे पदार्पण करीत असून पहिल्याच फटक्यात मला इतकी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारण्यस मिळत असल्याने मी अतिशय उत्साहित झाले आहे. लहान असल्यापसून मी डायन आणि त्यांच्या वाईट नजरेबद्दल मी इतक्या कथा ऐकल्या आहेत, पण मला तिचीच भूमिका टीव्हीवर रंगविण्यास मिळेल, असा मी कधीच विचार केला नव्हता. या मालिकेची मन खिळवून ठेवणारी कथा, आधुनिक भारतातील शहरांमध्ये अमनवी शक्तींमुळे घडणारे प्रसंग आणि यातील डायनचे सौंदर्य आणि तिच्या रूपाभोवती असलेल्या वलयामुळे मी या भूमिकेकडे आकर्षिले गेले. अशी ही व्यक्तिरेखा आणि तिच्यातील विविध खुब्या कथानकाच्या प्रत्येक भागात हळूहळू साकार करताना मला खूप आनंद होईल.” राठोड कुटुंबियांवर एका डायनची वाईट नजर गेले अनेक पिढ्या पडलेली असते आणि तिचा विपरित परिणाम त्यांच्या जीवनावर होत असतो. डायनची पावलं उलटी असतात आणि तिच्या लांब वेणीत तिची शक्ती दडलेली असते, असे


या मालिकेत स्मिता बन्सल, हर्ष राजपूत, अंकुर नय्यर, नियती फटनाणी, आशिता धवन आणि रितू सेठ यासारखे अनेक नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत. 

Web Title: Mona Lisa will play 'This' role in the nazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.