माधुरी दीक्षित म्हणते, 'या' शोचा भाग असणे माझ्यासाठी गौरवास्पद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:11 PM2018-07-12T16:11:20+5:302018-07-12T16:15:04+5:30

'डान्स दिवाने'च्या मंचावर लवकरच आपल्याला इशान खट्टर, जान्हवी कपूर, दिग्दर्शक करण जोहर विशेष पाहुणे म्हणून आलेले दिसणार आहेत.

Madhuri Dixit says that being part of this 'show' is a glorious one for me | माधुरी दीक्षित म्हणते, 'या' शोचा भाग असणे माझ्यासाठी गौरवास्पद

माधुरी दीक्षित म्हणते, 'या' शोचा भाग असणे माझ्यासाठी गौरवास्पद

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रभादीपला परीक्षकांनी 'हिरो ऑफ द स्टेज'चा किताब दिला आहे

कलर्सच्या डान्स दिवाने मध्ये भारतातील तीन पिढ्यांना डान्स विषयीची त्यांची आवड सादर करण्यासाठी एक समान मंच उपलब्ध करून दिला आहे आणि त्याची प्रेक्षकांनी स्तुती केली आहे. या वीकेंडला, मनोरंजनाचा डब्बल धमाका होणार आहे कारण की, धडकचे कलाकार- इशान खट्टर, जान्हवी कपूर, दिग्दर्शक करण जोहर विशेष पाहुणे म्हणून  येणार आहेत.

या आगामी एपिसोडमध्ये फ्रेंडशिप साजरी केली जाणार आहे ज्यात प्रत्येकाला त्यांच्या सुंदर आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा  आहे.  प्रभादीपने सादर केलेल्या सॅटर्डे सॅटर्डे गाण्याने संपूर्ण देशातील लोकांना खिळवून ठेवले. त्याच्या कामगिरीने परीक्षक भारावून गेले आणि त्याचा परफर्मेन्स पाहुन त्याला हिरो ऑफ द स्टेजचा किबात दिला. ऐवढेच नाही तर फ्रेंडशिप वीक साजरा करताना, सर्व स्पर्धकांनी त्याला आश्चर्यचकित करत, त्याला प्रत्येकाचा फोटो असणारा टीशर्ट भेट म्हणून दिला. प्रेमाचे बंध आणि एकमेकांविषयीचा आदर मंचावर दिसून येत होता. हे सर्व पाहून भारावलेल्या माधुरी दीक्षित म्हणाली, “या शोचा भाग असणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धकांचे बंध एकमेकांशी मनापासून जोडले गेले आहेत.''

माधुरीने या आधी 'नच बलिये' आणि 'झलक दिखला जा' सारख्या रिअॅलिटी शोला जज केले आहे. 'टोटल धमाल' चित्रपटातून अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर एकत्र शूट करतायेत. ‘टोटल धमाल’ हा चित्रपट ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘धमाल’च्या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तुफान कॉमेडी बघावयास मिळाली.  
 

Web Title: Madhuri Dixit says that being part of this 'show' is a glorious one for me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.