हे छोट्या पडद्यावरचे कलाकार चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षाही कमावतात जास्त पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 07:07 AM2017-10-30T07:07:24+5:302017-10-30T12:37:24+5:30

बॉलिवूडमधील कलाकार हे छोट्या पडद्यावरील कलाकारांपेक्षा अधिक पैसे कमावतात असे म्हटले जाते. पण या गोष्टीला अनेक टिव्हीवरील कलाकार अपवाद ...

This little screen artist has more money than the film's actors | हे छोट्या पडद्यावरचे कलाकार चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षाही कमावतात जास्त पैसे

हे छोट्या पडद्यावरचे कलाकार चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षाही कमावतात जास्त पैसे

googlenewsNext
लिवूडमधील कलाकार हे छोट्या पडद्यावरील कलाकारांपेक्षा अधिक पैसे कमावतात असे म्हटले जाते. पण या गोष्टीला अनेक टिव्हीवरील कलाकार अपवाद आहेत. आज छोट्या पडद्याला मिळालेले महत्त्व पाहाता छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार केवळ एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी लाखोहून अधिक रुपये कमावतात. त्यांची मिळकत बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. 

राम कपूर
राम कपूरला आपण घर एक मंदिर, कसम से, बडे अच्छे लगते है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. अनेक चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिका साकारतो. घर एक मंदिर या मालिकेतील रामच्या कामाचे कौतुक झाले असले तरी त्या मालिकेमुळे त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते है या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर बदलले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो केवळ एका भागाचे १ लाख २५ हजार रुपये घेतो.

Sakshi Tanwar

साक्षी तन्वर
कहानी घर घर की या मालिकेतील पार्वती या व्यक्तिरेखेमुळे साक्षी तन्वर नावारूपाला आली. बडे अच्छे लगते है या मालिकेतील राम कपूरसोबतची तिची केमिस्ट्री तर चांगलीच गाजली होती. साक्षी प्रत्येक भागासाठी ८० हजार रुपये घेते. 

Sakshi Tanwar

मोहित रैना
मोहित जम्मू काश्मीरमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. पण अभिनयाची आवड असल्याने तो करियर करण्यासाठी मुंबईत आला. त्याने अंतरिक्ष या मालिकेपासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याची ही मालिका तितकीशी गाजली नसली तरी त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच त्याच्या दिसण्यामुळे तो महिलांमध्ये प्रचंड फेमस झाला होता. देवों के देव महादेव या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने अशोक सम्राट या मालिकेतही काम केले. मोहित एका भागासाठी एक लाख रुपये घेतो. 

mohit raina

हिना खान
ये रिश्ता क्या कहलाता है या हिनाच्या पहिल्याच मालिकेमुळे ती नावारूपाला आली. या मालिकेतील तिने साकारलेल्या अक्षरा या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर ती खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शो मध्ये झळकली. सध्या ती आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. हिन एका भागासाठी लाख ते सव्वा लाख रुपये मानधन घ्यायची.

hina khan

रोनित रॉय
रोनितला छोट्या पडद्यावरचा अमिताभ बच्चन म्हटले जाते. कसोटी जिंदगी या मालिकेत प्रेक्षकांना तो ऋषभ बजाज या भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्याच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर त्याने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत मिहिरची भूमिका साकारली. रोनित आज चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. रोनित एका भागाचे सव्वा लाख रूपये घेतो आणि त्यातही तो महिन्यातील केवळ १५ दिवस काम करतो. 

ronit roy

दिव्यांका त्रिपाठी
दिव्यांका त्रिपाठीची बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या ती ये है मोहोब्बते या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते. या मालिकेतील इशिताची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दिव्यांका एका भागासाठी ८० हजार ते एक लाख रुपये घेते.

divyanka tripathi

शिवाजी साटम
सीआयडी ही मालिका गेल्या १८-१९ वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहे. या मालिकेत शिवाजी साटम आपल्याला एसीपी प्रद्युमन या भूमिकेत पाहायला मिळतात. कुछ तो गडबड है असे म्हणण्याची त्यांची स्टाईल तर लोकांमध्ये प्रचंड फेमस आहे. शिवाजी साटम एका भागासाठी एक लाख रुपये इतके मानधन घेतात.

shivaji satam

करण पटेल
कहानी घर घर की या मालिकेद्वारे करण पटेलने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कस्तुरी या मालिकेत तो झळकला. ये है मोहोब्बते या मालिकेतील रमण कुमार भल्ला या व्यक्तिरेखेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. करणला एका भागासाठी एक लाख रुपये मिळतात. 

Karan patel

Web Title: This little screen artist has more money than the film's actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.