'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधील या अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 04:28 PM2019-07-10T16:28:37+5:302019-07-10T16:29:21+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीमध्ये सुहासीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे.

kyunki saas bhi kabhi bahu thi fame pooja ghai gets married second time | 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधील या अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधील या अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीमध्ये सुहासीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा घई नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. पूजाने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत पूजा तिचा भाऊ व नवऱ्यासोबत दिसत आहे. 

पूजा बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर बिझनेसमॅन नौशीरसोबत विवाह बंधनात अडकली. पूजाने लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले की, माझा आधारस्तंभ, ताकद सगळं एका फ्रेममध्ये. माझी आई, माझी कुकी, माझा भाऊ, दीदी आणि माझा नवशू.


पूजाचे हे दुसरे लग्न असून यापूर्वी पूजाने नीरज रावलसोबत लग्न केले होते. दोघांना एक मुलगा देखील आहे. मात्र नात्यात आलेल्या दुराव्यानंतर पूजानं २००७ साली नीरजपासून विभक्त झाली होती.
या नात्यानंतर पूजा विकास कलांतरीसोबत दोन वर्षे रिलेशनमध्ये राहिली होती. मात्र दोघांचं नातंदेखील जास्त काळ टिकू शकलं नाही. हे नाते तुटण्यामागचं कारण समोर आलं होतं की पूजाला विकाससोबत लग्न करायचं होतं. मात्र असं झालं नाही आणि पूजाने ब्रेकअप करणं योग्य ठरवलं.


रिपोर्ट नुसार, पूजा घई तिचा एक्स बॉयफ्रेंड नीरजसोबत विभक्त झाल्यानंतर एकत्र आले. मुलाच्या सांगण्यावरून पूजा व नीरजने २०१० साली पुन्हा एकदा लग्न केलं. मात्र दुसऱ्या वेळी देखील हे नातं अयशस्वी ठरलं.


पूजाने टेलिव्हिजनवरील मालिकेसोबत काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतेच ती छोट्या पडद्यावरील मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीच्या टीमच्या रियुनियन पार्टीत दिसली होती.

Web Title: kyunki saas bhi kabhi bahu thi fame pooja ghai gets married second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.