'कसौटी जिंदगी की'मध्ये मि. बजाजच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 06:00 AM2019-05-14T06:00:00+5:302019-05-14T06:00:00+5:30

'कसौटी जिंदगी के' मालिकेच्या कथानकाला जवळपास दर भागात मिळत असलेल्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे मालिकेत सध्या नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत.

In the 'Kasauti Zindagi Ke' Actor will appear in Bajaj's role | 'कसौटी जिंदगी की'मध्ये मि. बजाजच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

'कसौटी जिंदगी की'मध्ये मि. बजाजच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

googlenewsNext

स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी के' मालिकेच्या कथानकाला जवळपास दर भागात मिळत असलेल्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे मालिकेत सध्या नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. आता या कथानकाला अधिकच उत्कंठावर्धक करण्यासाठी त्यात एका मि. बजाज या व्यक्तिरेखेचा समावेश करण्यात येणार असल्याचे निर्माती एकता कपूरने नुकतेच जाहीर केले आहे.

छोट्या पडद्यावरील एकेकाळी गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे मि. बजाज. आता ही व्यक्तीरेखा लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील  ‘कसौटी जिंदगी की’मध्ये पहायला मिळणार आहे. ही भूमिका कोण साकारणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. 

सध्या या भूमिकेत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता करण वाही दिसणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. सूत्रांनुसार, मि.बजाजच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांशी बातचीत करण्यात आली. रोनित रॉयने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती आणि आजही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आताच्या मालिकेतही बजाजच्या व्यक्तिरेखेचा आत्मा कायम ठेवण्यात येणार असला, तरी या व्यक्तिरेखेच्या बाह्यरूपात मोठा बदल होणार आहे. या व्यक्तिरेखेला न्याय देणे ही अतिशय मोठी जबाबदारी असून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप आहेत.

ह्या व्यक्तिरेखेला विविध पैलू आणि छटा आहेत. प्रेक्षकांच्या मते करण वाही अगदी अचूकपणे मि.बजाज साकारू शकेल. सगळे काही ठीक पार पडले तर करण वाहीच नवीन मि.बजाजच्या रूपात दिसून येईल.


मि. बजाजच्या भूमिकेत करण वाही पहायला मिळेल की नाही, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 

Web Title: In the 'Kasauti Zindagi Ke' Actor will appear in Bajaj's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.