लग्नात कृतिका कामराने घातला आपल्या आईचा लेहेंगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 11:02 AM2017-05-25T11:02:07+5:302017-05-25T16:32:07+5:30

आपल्या चेहर्‍यावर सदैव स्मितहास्य खेळविणा-या रूपसुंदर कृतिका कामराला टीव्ही उद्योगाची राणी म्हटल्यास वावगे ठरू नये! आपल्या साध्या परंतु उच्च ...

Kartika Kamarane will take her mother's wedding! | लग्नात कृतिका कामराने घातला आपल्या आईचा लेहेंगा!

लग्नात कृतिका कामराने घातला आपल्या आईचा लेहेंगा!

googlenewsNext
ल्या चेहर्‍यावर सदैव स्मितहास्य खेळविणा-या रूपसुंदर कृतिका कामराला टीव्ही उद्योगाची राणी म्हटल्यास वावगे ठरू नये! आपल्या साध्या परंतु उच्च अभिरुचीच्या कपड्य़ांच्या शैलीबद्दल विख्यात असलेल्या या अभिनेत्रीने आपल्या ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या फॅण्टसी मालिकेतील विवाहासाठी आपल्या आईचा सोन्याचे भरतकाम केलेला सोनेरी रंगाचा भरजरी लेहेंगा वापरला आहे. या मालिकेत आता चंद्रकांताच्या विवाहाच्या सोहळ्य़ाचे कथानक सुरू असून कृतिका कामराने या भव्य शाही विवाहाच्या आलीशानतेबाबत कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला. तिने डिझाईनर लेहेंग्याऐवजी आपल्या आईचाच भरजरी सोन्याचे भरतकाम असलेला लेहेंगा परिधान करण्याचा निर्णय घेतला. या भरजरी लेहेंग्यातील आपल्या तेजस्वी सौंदर्याचे दर्शन घडवून कृतिका आपल्या चाहत्यांना एक आनंदाचा धक्का देईल.सेटवरील एका सूत्राने सांगितले, “कृतिकाला जेव्हा या लग्नाच्या भागांच्या कथानकाची रूपरेषा समजावून सांगण्यात आली, तेव्हा तिला त्याबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली आणि याप्रसंगी आपल्या आईच्या लग्नातील भरजरी लेहेंगा वापरून तिने या कथानकाला एक वैयक्तिक स्पर्श दिला. हा लेहेंगा कथानकाच्या काळास साजेसा दिसण्यासाठी त्यात काही किरकोळ बदल करण्यात आले. कृतिकाने केवळ स्वत:च्या आवडीचा हा लेहेंगाच परिधान केला असं नाही, तर तिने आपल्या रंगभूषेच्या तपशिलातही काही बदल केले. आपल्या सौंदर्यात कोणतीही उणीव राहू नये, याबद्दल ती दक्ष होती.”पडद्यावरील विवाहात का होईना, आपल्या मुलीला वधूच्या वेषात पाहण्यासाठी कृतिकाची आईही या चित्रीकरणाच्या वेळी उपस्थित होती, असे आमच्या कानावर आले आहे. आपल्या ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या फॅण्टसी मालिकेत नववधूच्या वेशात कृतिका खरोखरीच एखाद्या राजकन्या शोभेल, यात शंका नाही!

Web Title: Kartika Kamarane will take her mother's wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.