जयडी आणणार शीतल आणि अजिंक्यच्या सुखी संसारात अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 11:12 AM2018-06-07T11:12:19+5:302018-06-07T16:42:19+5:30

जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी ...

Jawali will bring soft and unhappy bouts of happiness | जयडी आणणार शीतल आणि अजिंक्यच्या सुखी संसारात अडथळे

जयडी आणणार शीतल आणि अजिंक्यच्या सुखी संसारात अडथळे

googlenewsNext
थे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनली आहे. झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. नुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.

अजिंक्य शीतलचं लग्न तर झालं पण जयश्री घरात परत आल्याने सगळ्यांना टेन्शन आलं आहे. तिचा नवरा तिला परत घरी घेऊन जायला तयार नाही. अजिंक्य शीतलच्या वैवाहिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्यासाठी जयश्रीने हे सगळं जाणीवपूर्वक घडवून आणलंय. शीतल आणि अजिंक्यच्या संसारात विष कळवण्यासाठी जयडी कुठल्या ठरला जाईल? शीतल तिचा संसार सावरण्यात यशस्वी ठरेल का? हे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळेल.

या मालिकेत शीतलची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर ही साकारते आहे.शिवानी ही केवळ २५ वर्षांची असली तरी तिची कमाई ही खूपच जास्त आहे. शिवानी एका दिवसात किती रुपये कमवते हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. लागीरं झालं जी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी केवळ एका दिवसाचे ती २०-२५ हजार रुपये घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा आकडा कोणीही अधिकृत रित्या सांगितलेला नाहीये तर हा इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे शिवानी दिवसांची कमाई खरंच इतकी आहे का हे केवळ तीच आपल्याला सांगू शकते. 

Web Title: Jawali will bring soft and unhappy bouts of happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.