राणा अंजली आणि गुरु राधिका असा साजरा करतायेत 'गुढीपाडवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 09:03 AM2017-03-27T09:03:29+5:302017-03-27T14:33:29+5:30

गुढीपाडव्याचा आनंदोत्सव छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही बघायला मिळणार आहे.मालिकांमध्ये आणि नववर्षाची गुढी उभारण्यात येणार आहे आणि मालिकेला नवं वळणही मिळणार ...

'Gudi Padva' is celebrating like Rana Anjali and Guru Radhika | राणा अंजली आणि गुरु राधिका असा साजरा करतायेत 'गुढीपाडवा'

राणा अंजली आणि गुरु राधिका असा साजरा करतायेत 'गुढीपाडवा'

googlenewsNext
ढीपाडव्याचा आनंदोत्सव छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही बघायला मिळणार आहे.मालिकांमध्ये आणि नववर्षाची गुढी उभारण्यात येणार आहे आणि मालिकेला नवं वळणही मिळणार आहे. छोट्या पडद्यावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने रसिकांना मनोरंजनाची ट्रीट मिळणार हे मात्र नक्की


राणा-अंजली घरी परतणार



'तुझ्यात जीव रंगला'मधील राणादा आणि अंजली या दोघांचं नुकतंच लग्न झालं मात्र लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं ज्याला राणा बळी पडला होता. राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून या राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहेत.

गुरुसोबत राधिकाने उभारली गुढी



ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला धडा शिकवण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे.कोणताही सण किंवा समारंभ असो तो कुटुंबासमवेत साजरा करणे हा राधिकाचा स्वभाव. जरी शनाया राधिकाच्या हक्काच्या घरात ठाण मांडून बसली असली तरी हा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आपल्याच घरात साजरा करणार असा निर्णय राधिका घेते. गुढीपाडव्याच्या दिवशी छान सजून राधिका घरी पोचते आणि गुरुनाथलाही यासाठी तयार करते. यावेळी नेहमीप्रमाणे शनाया विरोध करते परंतु राधिका तिच्याकडे दुर्लक्ष करत गुरुसोबत ही गुढी उभारते.

गौरी आणि अम्मा दोन्ही मिळून करणार पाककृती



‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाच्या माध्यमातून. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये सासू सुनेचा धमाल स्वयंपाक सोहळा रंगणार आहे.'काहे दिया परदेस'मध्ये सध्या गौरी आपल्या माहेरी आली आहे. कुटुंबात निर्माण झालेले गैरसमज, अम्माजीने रचलेली खेळी यामुळे शीव आणि गौरीच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. परंतु आता अम्माजींची नाराजी दूर करण्यासाठी संकर्षण गौरीच्या मदतीला येणार आहे. खवय्येच्या किचनमध्ये या दोन्ही सासू सुना एकत्र येत टमाटर आलू चाट आणि कच्च्या पपईचा हलवा या पाककृती बनविणार आहेत.

मालती - नानी बनवणार काकडीची खीर आणि केळ्याची भाजी 




‘चुकभूल द्यावी घ्यावी’ मधील नानी म्हणजे जणू कडकलक्ष्मीच.नानींपुढे याही वयात ना राजाभाऊंचं काही चालतं ना मालतीचं. असं असलं तरीही नानी सर्वांवर प्रेमही तेवढंच करते आणि घरातील सर्वजण नानींचा शब्दही आज्ञेप्रमाणे पाळतात. या दोघी सासू सुनांची जुगलबंदी खवय्येच्या किचनमध्ये बघायला मिळणार आहे. यात नानी (नयना आपटे) काकडीची खीर बनवणार आहेत तर मालती (सुकन्या मोने) केळ्याची भाजी बनविणार आहेत.

Web Title: 'Gudi Padva' is celebrating like Rana Anjali and Guru Radhika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.