​‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील गौरव सरीन जेव्हा कॅप्टन रोहित शर्माला भेटला…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 09:15 AM2018-05-18T09:15:35+5:302018-05-18T14:45:35+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या आगामी मालिकेत राधे या तरुणाची भूमिका रंगविणारा अभिनेता गौरव सरीन अलीकडेच आयपीएल क्रिकेट ...

Gaurav Sarin met Captain Rohit Sharma in 'Krishna Walks London' series ... | ​‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील गौरव सरीन जेव्हा कॅप्टन रोहित शर्माला भेटला…

​‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील गौरव सरीन जेव्हा कॅप्टन रोहित शर्माला भेटला…

googlenewsNext
्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या आगामी मालिकेत राधे या तरुणाची भूमिका रंगविणारा अभिनेता गौरव सरीन अलीकडेच आयपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी मुंबईत आला होता. क्रिकेटचा जबरदस्त चाहता असलेला गौरव यावेळी प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून मुंबई इंडियन्स संघाला उत्तेजन देताना दिसत होता. किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर मुंबई इंडियन्सने जोरदार विजय मिळविल्याने गौरव खूपच आनंदित झाला होता. यानंतर गौरवला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची भेट घेता आल्याने त्याच्या आनंदात मोठीच भर पडली. यावेळी त्याच्या हस्ते रोहित शर्माला ‘स्टार प्लस’तर्फे ‘नई सोच’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याविषयी गौरव सरीन सांगतो, “मी स्वत: रोहित शर्माचा चाहता असून त्याच्या मुंबई इंडियन्स संघाने मिळविलेल्या विजयामुळे मी भलताच खूश झालो होतो. सामन्यानंतर माझ्या हस्ते रोहितला पुरस्कार देण्यात आल्याने मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो. यावेळी त्याने मला सांगितले की, त्याने माझ्या आगामी मालिकेच्या जाहिरातीची झलक पाहिली असून त्याला हा जाहिरातीचा प्रोमो आवडला आहे. त्याने माझ्या मालिकेच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या. ही खरोखरच एक संस्मरणीय संध्याकाळ ठरली. 
‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत राधे या मुलाची प्रेमकथा सादर करण्यात आली आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून गौरव सरीन याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. राधेचे एकच स्वप्न आहे ते म्हणजे लग्न करणे! तो स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे.
राधेच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य त्या कलाकाराची निवड करण्यासाठी शंभराहून अधिक इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्यात आली होती आणि त्यातून गौरव सरीनची निवड करण्यात आली. या व्यक्तिरेखेसाठी चेहऱ्यावर अगदी निरागस भाव असलेल्या कलाकाराची गरज होती. निर्मात्यांच्या मते या भूमिकेसाठी असलेले सगळे गुण गौरवमध्ये होते. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली. 
कृष्णा चली लंडन या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा प्रोमा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 

Also Read : राधेचा लूक ‘बरेली की बर्फी’तील आयुष्यमान खुराणावर आधारित!

Web Title: Gaurav Sarin met Captain Rohit Sharma in 'Krishna Walks London' series ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.