‘जिजाजी छतपर है’ मालिकेत काय होणार इलायची आणि पंचमच्या प्रेमप्रकरणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:30 AM2018-12-13T06:30:00+5:302018-12-13T06:30:03+5:30

पंचम आणि इलायची हे दोघे अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण त्याची ही भावना एकमेकांकडे कधी व्यक्त केली नाहीये. पण आता ते दोघे आपल्या भावनांविषयी एकमेकांना सांगणार आहेत.

elaichi and pancham romance will blossom in jijaji chhat par hai | ‘जिजाजी छतपर है’ मालिकेत काय होणार इलायची आणि पंचमच्या प्रेमप्रकरणाचे?

‘जिजाजी छतपर है’ मालिकेत काय होणार इलायची आणि पंचमच्या प्रेमप्रकरणाचे?

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘जिजाजी छतपर हैं या मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्ये मुरारी (अनुप उपाध्याय)ला एक पत्र मिळणार आहे‚ ज्यात पंचमने इलायचीबाबतच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर है' या मालिकेने आपल्‍या रोमांचकारी पटकथांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ही मालिका प्रेक्षकांना भावनिक रोलर-कास्‍टर राइडवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज झाली आहे. इलायची (हिबा नवाब) पंचम (निखिल खुराना) यांच्यात नात्यात आता अनेक घटना घडणार आहेत. ते दोघे आता प्रेमाची नवीन अनुभूती देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पंचम आणि इलायची हे दोघे अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण त्याची ही भावना एकमेकांकडे कधी व्यक्त केली नाहीये. पण आता ते दोघे आपल्या भावनांविषयी एकमेकांना सांगणार आहेत. ‘जिजाजी छतपर हैं या मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्ये मुरारी (अनुप उपाध्याय)ला एक पत्र मिळणार आहे‚ ज्यात पंचमने इलायचीबाबतच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

या बहरत्या प्रेमाची माहिती नसलेला छोटे इलायचीसाठी मुरारीच्या सांगण्यावरून मुले शोधणार आहे. यामुळे घाबरलेली इलायची पंचमला आपल्या वडिलांचा सामना करण्यासाठी आणि आपल्या दोघांबाबतचे सत्य सांगण्यासाठी सांगणार आहे. त्यामुळे तो इलायचीबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्र लिहिणार आहे. पण या नाट्यात आता भर पडणार आहे. कारण हे पत्र गच्चीवरून थेट मुरारीच्या हातात पडणार आहे आणि त्यातच आपल्या मुलासाठी इलायचीला मागणी घालण्यासाठी आलेले जोडपे पंचमने ज्या मुलीचे थिएटरमध्ये चुंबन घेतले ती इलायची असल्याचे ओळखणार आहे आणि त्यामुळे या गोष्टीला एक वेगळे वळण मिळणार आहे. त्यामुळे सत्य कळल्यावर इलायची आणि पंचमची प्रेमकथा संपुष्टात येईल का? हे पाहणे रंजक असणार आहे. मुरारीच्या भूमिकेत असलेला अनुप उपाध्याय याविषयी सांगतो, ‘‘जिजाजी छत पर हैं हा शो एक खास प्रेमकथा विनोदी ढंगाने सादर करतो. या कार्यक्रमाला आपल्या प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहणे ही आनंददायी गोष्ट असून आमचे सर्वोत्तम देण्यासाठी आम्हाला त्यामुळे प्रेरणा मिळते. तथापि, इतके छान कलाकार आणि कर्मचारी यांच्यासोबत सेटवर काम करताना खूप धमाल येते.’’

‘जिजाजी छत पर हैं’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना सोनी सबवर पाहायला मिळते. 

Web Title: elaichi and pancham romance will blossom in jijaji chhat par hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.