अस्सल मातीतले कलाकार येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 07:15 AM2019-03-11T07:15:00+5:302019-03-11T07:15:00+5:30

सुकन्या काळन देखील नाचतो डोंबारी या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे.

Ekdum Kadak Show New Performance | अस्सल मातीतले कलाकार येणार रसिकांच्या भेटीला

अस्सल मातीतले कलाकार येणार रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

एकदम कडकच्या मंचावर आतापर्यंत मांडव महाराष्ट्राचा, सामना महाराष्ट्राचा, किनारा महाराष्ट्राचा या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना विशेष परफॉर्मन्स बघायला मिळाले. आता येत्या आठवड्यामध्ये एकदम कडकच्या मंचावर येणार आहेत असे अस्सल मातीतले कलाकार ज्यांना आमंत्रणाची गरज नाही, ना रंगमंचाची अट, यांच्या डोक्यावर निळ्या आभाळाचा मंडप आहे, पायाखालची माती ह्यांचा रंगमंच आहे असे “फिरस्ते महाराष्ट्राचे”. हे कलाकार या आठवड्यात गाजवणार एकदम कडकचा मंच. हे आले की मनाला थक्क करून ठेवतात... त्यांची कला बघून आपण सगळेच थक्क होतो. याचबरोबर कार्यक्रमामधील विनोदवीरांचे काही स्कीट देखील बघायला मिळणार आहेत.  


नाटकासाठी मंच असतो, भारुड, किर्तनाची पारायण होतात, कव्वालीचे जंगी सामने होतात, या सगळयांना आमंत्रण देऊन बोलावलं जात पण या आठवड्यात कार्यक्रमामध्ये असे कलाकार येणार आहेत ज्यांना कोणी बोलवत नाही पण ते आले कि त्यांना कुणी जाऊ देत नाही. एकदम कडकच्या मंचावर  प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे थक्क करणारे परफॉर्मन्स जसे डोंबारीचा खेळ, रॅपर ऋषिकेश जाधवचा धम्माकेदार अॅक्ट,कडूबाई खरात यांचे गाणे, तसेच लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर बाई माझी करंगळी मोडली या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. सुकन्या काळन देखील नाचतो डोंबारी या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे.
 

Web Title: Ekdum Kadak Show New Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.