​दुहेरीच्या संकेत पाठकने वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2017 09:38 AM2017-05-03T09:38:43+5:302017-05-03T15:36:47+5:30

दुहेरी या मालिकेत संकेत पाठक दुष्यंत ही भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्याचे काम प्रेक्षकांना ...

Dual signals shared by the reader shared on the occasion of birthday | ​दुहेरीच्या संकेत पाठकने वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केल्या आठवणी

​दुहेरीच्या संकेत पाठकने वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केल्या आठवणी

googlenewsNext
हेरी या मालिकेत संकेत पाठक दुष्यंत ही भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्याचे काम प्रेक्षकांना प्रचंड आवडते. संकेतचा आज वाढदिवस असून त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास आठवण आमच्यासोबत शेअर केली आहे. संकेत आज प्रसिद्ध अभिनेता असल्याने त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट खरेदी करणे हे कठीण नाही. पण त्याच्या शालेय जीवनात त्याला हे शक्य व्हायचे नाही. त्यावेळेची एक आठवण त्याने सांगितली आहे. तो सांगतो, मी शाळेत असताना माझ्याकडे तितकेशे पैसे नसायचे आणि काहीतरी मजा-मस्ती करणे किंवा थोडक्यात काही तरी किडे करणे हे माझ्या स्वाभावातच आहे. आम्ही शाळेत असताना पैसे जमवून मित्रमंडळी चित्रपट पाहायला जात असे आणि जाताना नाशिकमधील प्रसिद्ध भेळ घेत असे. मल्टिप्लेक्समध्ये काहीही खायचे पदार्थ घेऊन जायला बंदी असते. त्यामुळे आम्ही भेळ आमच्या हॅल्मेट मध्ये लवपत असू. सिक्युरीटी चेकिंग होत असताना मी आणि माझा मित्र भेळीचे पॅकेट्स हॅलमेटमध्ये ठेवत. आमच्या बॅगा चेक केल्या जात असत. तसेच आमचे खिसे पाहिले जात असत. पण आमच्या हॅल्मेटमध्ये भेळ असू शकते असा कधी कोणाला संशय देखील येत नसे. खरे तर चेकिंग करताना हॅल्मेट बाजूला ठेवायला सांगितले जात असे. त्यामुळेच तर अतिशय सोईस्कररित्या आम्ही भेळ आतमध्ये घेऊन जात असू. यामुळे केवळ 50 रुपयांमध्ये आमचा इंटरव्हलमध्ये खाण्याचा बंदोबस्त होत असे.
तुमचा लाडका दुष्यंत म्हणजेच संकेत पाठक हा किती खोडकर वृत्तीचा आहे हे तुम्हाला यातून नक्कीच कळले असेल.
संकेतला सीएनएक्सकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Web Title: Dual signals shared by the reader shared on the occasion of birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.