अर्शी खानला एक्सपोझ करणे सपना अन् प्रियांकला पडले महागात; या व्यक्तीने केला गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 02:25 PM2017-10-28T14:25:22+5:302017-10-28T19:55:22+5:30

गेल्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये जे काही घडले त्यावरून प्रियांक शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आज वीकेण्ड का वारमध्ये या ...

Dreams and Priyanka fall in exposure to Arshi Khan; This person filed a complaint! | अर्शी खानला एक्सपोझ करणे सपना अन् प्रियांकला पडले महागात; या व्यक्तीने केला गुन्हा दाखल!

अर्शी खानला एक्सपोझ करणे सपना अन् प्रियांकला पडले महागात; या व्यक्तीने केला गुन्हा दाखल!

googlenewsNext
ल्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये जे काही घडले त्यावरून प्रियांक शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आज वीकेण्ड का वारमध्ये या हॉट हंकच्या कारनाम्यावर सलमान खान त्याचा चांगलाच समाचार घेण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारच्या रात्री प्रियांकने अर्शीच्या खासगी आयुष्याबद्दल असे काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अर्शीदेखील प्रचंड दु:खी झाली असून, ती सतत या ना त्या कारणाने रडत आहे. प्रियांकने बोलता बोलता अर्शीच्या पास्टचा मुद्दा उपस्थित करीत ती कशी पुणे आणि गोवा सेक्स रॅकेटमध्ये फसली होती, याचा उलगडा केला आहे. तसेच यावरूनच सपना चौधरी हिने अर्शीवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, अर्शीच्या या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली असून, घराबाहेरही अर्शी खान प्रकरण चवीने चर्चिले जात आहे. 

ALSO READ : अर्शी खानला एकदा नव्हे तर दोनदा झाली सेक्स रॅकेटमध्ये अटक; गोवा-पुणे कनेक्शन आले समोर!

दरम्यान, प्रियांक आणि सपनाच्या या उपदव्यापानंतर अर्शी खानचे मॅनेजर फ्लिन रेमेडीयोज यांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर त्यांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत लिहिले की, एखादे चॅनेल अशाप्रकारचा कन्टेंट कसा काय दाखवू शकतात? कारण यातून एका महिलेचे सरळसरळ चरित्रहनन केले जात आहे. 

ALSO READ : अर्शी खानच्या पुणे सेक्स रॅकेट प्रकरणात समोर आले धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर!

दरम्यान, प्रियांकच्या या प्रकारानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्याच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. प्रियांकला पुन्हा घरात एंट्री दिल्याने त्याच्याकडे घरातील बºयाचशा सदस्यांविषयीचे रहस्य दडलेले आहे. विशेषकरून अर्शी, पुनीश शर्मा आणि आकाश डडलानी यांच्याबद्दल त्याने बरेच काही जाणून घेतले आहे. कारण जेव्हा तो पहिल्यांदा घरात आला होता, तेव्हा त्याला या तिघांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळेच त्याने या सर्वांना एक्सपोझ करण्याचे ठरविले आहे. आता सलमान खान त्याच्या या प्रतापाबद्दल त्यावर कसा बरसतो हे बघणे मजेशीर ठरणार आहे. 

Web Title: Dreams and Priyanka fall in exposure to Arshi Khan; This person filed a complaint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.