ना घर का ना घाट का कपिल शर्माची अशी झाली अवस्था,नवीन फोटो Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:10 PM2018-08-02T12:10:35+5:302018-08-02T12:13:09+5:30

जितक्या वेगाने कपिल लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन तो खालीही फेकला गेला. 

Comedy king Kapil Sharma's latest Pic with His Pet | ना घर का ना घाट का कपिल शर्माची अशी झाली अवस्था,नवीन फोटो Viral

ना घर का ना घाट का कपिल शर्माची अशी झाली अवस्था,नवीन फोटो Viral

googlenewsNext

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा चर्चेत आला आहे. आता कपिलची चर्चा होण्यासाठी कारणीभूत ठरला आहे त्याचा हा फोटो. या फोटोला पाहून तो खूप तणावात असल्याचे जाणवेल. फोटोत त्याचा बदलेला लूक तो डिप्रेशनमध्ये असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.सध्या कपिल डिप्रेशनमध्ये असून याच गोष्टीचा परिणाम त्याच्या करियरवर झाल्याचे सा-यांनाच माहिती आहे.स्टारडम सांभाळणं आणि बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. जितक्या वेगाने कपिल लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन तो खालीही फेकला गेला. 

स्वतःला मिळालेलं स्टारडम तो सांभाळू शकला नाही आणि वाट चुकला. विमानप्रवासात सहकलाकारांना मारहाण करणं इथपासून ते आपल्या शोमध्ये पाहुण्यांना वाट बघायला लावणं असो किंना आणखीन वादग्रस्त गोष्टी सगळं काही कपिलच्या विरोधात घडणा-या गोष्टींमुळेच कपिल आज स्वतःला सावरू शकत नाही.कपिलसाठी हा काळ सगळ्यात आव्हानात्मक आणि संघर्षाचा काळ असला तरीही त्याने स्वतःला हरु न देता त्याचा सामना करणे हाच एक पर्याय आता त्याच्याकडे उरला आहे.इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे डिप्रेशनचे शिकार झाले आहेत. मात्र आयुष्याच्या नव्या लढाईसाठीही सज्ज झाले आहेत. या सगळ्या लोकांची उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून त्याने या सगळ्यांकडून बोध घेण्याची गरज असल्याचे नेटीझन्स कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

कॉमेडीचे व्यसन असलेल्या कपिलला आता इतर व्यसनंही जडली आहेत... त्यामुळेच रिहॅब सेंटरमध्ये त्याच्या डिप्रेशनवर उपचार सुरु आहेत. तो जास्तीत जास्त वेळ आपला कुत्रा चिकूसोबत घालवत आहे. अपयश आणि एकाकीपणामुळं या व्यसनांचा अतिरेक झाल्यानं त्यांची तब्येत खालावू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच  कपिलची एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोसने खुलासा केला होता की, कपिलची मानसिक स्थिती ठिक नाही.

एकेकाळी सा-यांची दुःख विसरून हसून हसून लोटपोट करणारा कपिलने आपल्या कामांमधून ब्रेक घेतला आहे.इतकेच नाहीतर सोशल मीडियापासून दूर  झाला असून हेच त्याचे रूटीन बनले आहे.तसेच त्याचे आजही अनेक चाहते कपिलचे दर्शन पुन्हा कधी घडणार याकडेच त्यांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Comedy king Kapil Sharma's latest Pic with His Pet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.