काय सांगता! अनीता हसनंदानी चक्क करतेय 14-14 तास डान्सशी प्रॉक्टिस, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 04:51 PM2019-07-10T16:51:50+5:302019-07-10T17:01:01+5:30

नागीन फेम अनीता हसनंदानी छोट्या पदड्यावरील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी आहे. सलमान खान निर्मित नच बलिये सीझन 9 मध्ये झळकणार आहे.

Anita hassanandani will seen in nach baliye 9 | काय सांगता! अनीता हसनंदानी चक्क करतेय 14-14 तास डान्सशी प्रॉक्टिस, जाणून घ्या यामागचे कारण

काय सांगता! अनीता हसनंदानी चक्क करतेय 14-14 तास डान्सशी प्रॉक्टिस, जाणून घ्या यामागचे कारण

googlenewsNext

नागीन फेम अनीता हसनंदानी छोट्या पदड्यावरील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी आहे. सलमान खान निर्मित नच बलिये सीझन 9 मध्ये झळकणार आहे. नच बलियेच्या प्रमोमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसली. 


अनीता हसनंदानी म्हणाली, ''मला डान्स करण्यास आवडते आणि मी नेहमीच नच बलियेचा एक भाग बनू इच्छित होते पण कामामुळे मला ते पूर्वी शक्य झाले नाही. पण आता मी नचवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यास तयार आहे.'' 


अनिता सध्या वर्कआऊट आणि डान्सचा सराव दररोज करत आहे. तिचा दिवस सकाळी ८ वाजता सुरू होतो आणि रात्री १० वाजता संपतो. ती म्हणते, “मी खूप काळानंतर डान्स करत आहे त्यामुळे मी त्याचा सराव मी करतेय. माझे कोरियोग्राफर्स मला जे काही शिकवत आहेत त्यात मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतेय.''


अनीता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती एकता कपूरची खास मैत्रिण आहे. अनीताने 'नागिन ३' मालिकेत साकारलेली विशाखाची भूमिका चांगलीच गाजली होती. यातील अनीताचा क्लासी लूक व ट्रेंडी आऊटफिट लोकांना खूप भावला होता. 
शोच्या संकल्पनेत नवीन ट्विस्टसाठी या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमध्ये माजी आणि पाच सध्याच्या जोडप्यांना सहभागी केले आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: Anita hassanandani will seen in nach baliye 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.