अनिल थत्ते यांनी भूषण कडुला वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 04:05 AM2018-05-14T04:05:37+5:302018-05-14T11:49:28+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील ...

Anil Thattay saved Bhushan Kadula | अनिल थत्ते यांनी भूषण कडुला वाचवले

अनिल थत्ते यांनी भूषण कडुला वाचवले

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. परंतु, मातृदिना निमित्त सगळ्यांना बिग बॉसने एक सरप्राईझ दिले. सगळ्या सदस्यांना त्यांच्या आईशी बोलण्याची  संधी बिग बॉसने दिली. याक्षणी प्रत्येक सदस्य खूपच भावूक होताना दिसला. घरातील सदस्य बऱ्याच दिवसां पासून आपल्या नातेवाईंकापासून दूर रहात आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. शेवटी तो कठीण क्षण आला जेव्हा कोणा एकाला घरातून बाहेर जावं लागणार होतं. आस्ताद काळे, अनिल थत्ते आणि सुशांत शेलार हे डेंजर झोनमध्ये आले. आणि त्यातून सगळ्यात कमी मत अनिल थत्ते यांना मिळाली. त्यामुळे अनिल थत्ते यांना घराबाहेर जावं लागलं. अनिल थत्ते घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. सगळे खूप भावुक झाले. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण नवा कॅप्टन बनेल ? कोणते टास्क सदस्यांना मिळतील हे बघणे रंजक असणार आहे. 

उषा नाडकर्णी यांना त्यांच्या मुलाचा कॉल आला तेव्हा त्या खूप भावुक झाल्या. त्यांनी त्यांच्या आईविषयीच्या बऱ्याच आठवणी प्रेक्षकांना सांगितल्या. त्यांच्या मुलाने बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याअगोदर त्यांना वचन दिले होते कि, कोणाशी वाद घालू नकोस जे त्यांनी यावेळेस परत घेतले. आणि उषा नाडकर्णी यांना त्यांचा गेम खेळायला सांगितला. त्याचप्रमाणे, ऋतुजा, जुई, आस्ताद यांनादेखील त्यांच्या आईचा कॉल आला आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या घरच्यांचा त्यांना पाठींबा आहे असे देखील सांगितले ज्यामुळे सगळ्या सदस्यांना खूप आनंद झाला. रेशम आणि मेघाला देखील त्यांच्या मुलांचा कॉल आला.   
 

अनिल थत्ते घरामधून बाहेर पडल्यानंतर त्यांना एक विशेष अधिकार मिळाला ज्यानुसार ते कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्याच्या घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी वाचवू शकतात आणि अनिल थत्ते यांनी भूषण कडुला वाचवले.

Web Title: Anil Thattay saved Bhushan Kadula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.