'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये चाची घेणार अल्लादिनचा बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 07:29 PM2018-10-08T19:29:09+5:302018-10-08T19:30:30+5:30

सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने प्रेक्षकांना बगदादच्या फँटसी राईडचा रोचक प्रवास आजवर अगदी यशस्वीरित्या घडवला आहे.

'Alladin: Naam To Suna Hoga', Chachi will take revenge of Alladin | 'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये चाची घेणार अल्लादिनचा बदला

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये चाची घेणार अल्लादिनचा बदला

googlenewsNext
ठळक मुद्देचाची घेणार अल्लादीनचा बदला


सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने प्रेक्षकांना बगदादच्या फँटसी राईडचा रोचक प्रवास आजवर अगदी यशस्वीरित्या घडवला आहे. या मालिकेच्या खिळवून ठेवणाऱ्या पटकथेच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडलेत. अल्लादीनने चाचीला आपण तिचे काम आता करणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे, आता आगामी भागात चाची (गुलफाम खान) अल्लादीन (सिद्धार्थ निगम)चा बदला घेणार आहे.


चाचाला (बर्दुल इस्लाम) एक साधासा पंख अतिशय मौल्यवान वस्तू असल्याचे सांगून फसवण्याचा प्रयत्न अल्लादिन करतो. मात्र, ही योजना अपेक्षेप्रमाणे आकार घेत नाही. चाची यात लक्ष घालते आणि अल्लादिनचा खोटारडेपणा पकडला जातो. चाचीच्या जाचाला कंटाळलेला अल्लादिन तिला सांगतो की, आता तो तिच्यासाठी काम करणार नाही. हे ऐकून चाचीच्या रागाचा पारा चढतो आणि ती त्याचा बदला घ्यायचा, असे ठरवते.
अल्लादिनची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्हणाला, 'अल्लादिनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करताना एक कलाकार म्हणून मी रोज काही नवे शिकतोय. आगामी भागांमध्ये बदला घेण्यासाठी चाचीचे दुष्ट आराखडे बघताना प्रेक्षकांना मजा येणार आहे.'
चाचीची भूमिका साकारणारी गुलफाम खान म्हणाली, 'मला वाटते, मालिका यशस्वी होण्यासाठी त्यातील कलाकारांमध्ये छान नाते असणे आवश्यक आहे आणि आम्ही एकमेकांसोबत खरंच फार छान असतो. सेटवरील हलक्याफुलक्या वातावरणामुळे मी काम करतेय, असे वाटतच नाही. आगामी भागात अल्लादिनला माझ्या रागाचा सामना कसा करावा लागतो आणि त्यावर तो काय करतो, हे पाहणे प्रेक्षकांना आवडेल, याची मला खात्री आहे.'

Web Title: 'Alladin: Naam To Suna Hoga', Chachi will take revenge of Alladin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.