सोनी सबच्या 'जीजाजी छतपर हैं'मध्ये कोणाला विष देण्याचा रचला जातोय बेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 10:36 AM2018-06-05T10:36:36+5:302018-06-05T16:06:36+5:30

सोनी सबचा 'जीजाजी छतपर हैं' हा शो आपल्या चाहत्यांना आपल्या सुंदर कथानक आणि वैविध्यपूर्ण कलाकारांच्या माध्यमातून विशेष संकल्पनेद्वारे खिळवून ...

Sony is trying to poison anyone in Sabah's 'Jijaji Roofer' | सोनी सबच्या 'जीजाजी छतपर हैं'मध्ये कोणाला विष देण्याचा रचला जातोय बेत

सोनी सबच्या 'जीजाजी छतपर हैं'मध्ये कोणाला विष देण्याचा रचला जातोय बेत

googlenewsNext
नी सबचा 'जीजाजी छतपर हैं' हा शो आपल्या चाहत्यांना आपल्या सुंदर कथानक आणि वैविध्यपूर्ण कलाकारांच्या माध्यमातून विशेष संकल्पनेद्वारे खिळवून ठेवत आहे. प्रत्येकजण टँकर माफियाला पकडण्यात बिझी असताना चांदणी चौकात कोणीतरी खुन करण्याचा प्लान करतंय.  
आगामी एपिसोड्समध्ये मौसाजी हे ज्योतिषी मुरारीला (अनुप उपाध्याय) सांगतात की, कुणीतरी त्याच्या जेवणात विष घालेल आणि त्याला ठार करण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी चंटकी (फिरोज)ला घरात उंदीर सापडतो आणि तो त्याला मुरारीचे नाव देतो कारण त्याला तो मुरारीसारखा वाटतो. करूणाच्या (सोमा राठोड)च्या आग्रहावरून चंटकी त्या उंदराला मारण्याचे विविध उपाय शोधू लागतो. चंटकी शेवटी त्या उंदराला म्हणजे मुरारीला विष देऊन ठार मारण्याचे ठरवतो. मुरारी हा संवाद ऐकतो आणि चंटकी आपल्यालाच ठार करणार आहे असा त्याचा समज होतो.
आपला जीव जाणार या भीतीने घाबरलेला मुरारी काहीही न खाण्याचा निर्णय घेतो आणि आपल्या तब्येतीबाबत सावध होतो. करूणा नेहमीसारखा स्वयंपाक करते... परंतु घाबरलेला मुरारी घरातल्या कोणालाही ते जेवण खाऊ देत नाही. भूक न आवरल्याने करूणा ते जेवण खाते आणि बेशुद्ध पडते. त्यामुळे त्या अन्नात विष असल्याची मुरारीची खात्री पटते. 
करूणाने जेवणात खरेच विष घातले आहे का? कुणी मुरारीला ठार करण्याचा प्रयत्न करत आहे का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना जीजाजी छतपर है या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. या कथानकाबद्दल बोलताना अनुप उपाध्याय ऊर्फ मुरारी सांगतात की, “हा भाग आम्हा सर्वांसाठी अत्यंत धमाल आणि मजेचा होता. चंटकी उंदराला मुरारीचे नाव देतो आणि तो मला ठार करणार असल्याचा माझा समज होतो तेव्हा गोंधळ निर्माण होतो. या भागाचे चित्रीकरण करताना आम्ही खूप धमाल केली. परंतु मी आमच्या प्रेक्षकांना सांगेन की तुमच्या शंका आणि मनातील गोंधळ वेळीच दूर करा. नंतर मी केला तसा पश्चाताप करू नका.”

Also Read : जिजाजी छत पर है या मालिकेच्या टीमने १०० भाग पूर्ण झाल्याचे असे केले सेलिब्रेशन



Web Title: Sony is trying to poison anyone in Sabah's 'Jijaji Roofer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.