शर्मिष्ठा राऊत म्हणते, बिग बॉसच्या घरात मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 12:15 PM2018-05-23T12:15:39+5:302018-05-23T17:45:39+5:30

नुकतीच बिग बॉसच्या घरात हर्षदा खानविलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. हर्षदा घरातील एक आठवडा चांगलाच रंगला. आता या ...

Sharmishtha Raut says, in Bigg Boss house, I will play my independent game | शर्मिष्ठा राऊत म्हणते, बिग बॉसच्या घरात मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार

शर्मिष्ठा राऊत म्हणते, बिग बॉसच्या घरात मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार

googlenewsNext
कतीच बिग बॉसच्या घरात हर्षदा खानविलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. हर्षदा घरातील एक आठवडा चांगलाच रंगला. आता या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री होणार आहे. हर्षदानंतर आता वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे शर्मिष्ठा राऊत घरामध्ये जाणार आहे.
 
शर्मिष्ठा राऊत यावर बोलताना म्हणाली, “मी खूप उत्सुक आहे, आत नक्कीच खुप मज्जा येणार आहे, पण तितकच टेंशन सुध्दा आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेले सगळेच सदस्य माझे मित्र आहेत पण मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार हे नक्की. मी बिग बॉसची चाहती आहे. मीच माझी खूप मोठी स्पर्धक आहे असे मला वाटतं. या घरामध्ये मी माझा लढा लढेन आणि मीच स्वत:ला हा खेळ जिंकून देऊन शकते. टास्कबद्दल बोलायचं झालं तर, मला टास्क खूप आवडतात कारण माझ्या आयुष्यात देखील मला अॅडव्हेंचर खूप आवडतं मी आताचं स्काय डायव्हिंग केलं आहे. त्यामुळे टास्ककडे खूपच सकारात्मक दृष्टीने बघते. मी जशी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये आहे तशीच मी या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये देखील वावरताना  प्रेक्षकांना दिसेन, कारण कार्यक्रमाचीच टॅगलाईऩ आहे दिसतं तसंच असतं. जिथे मला पटेल तिथे मी शांत असेन पण जिथे मला पटणार नाही तिथे मात्र मी नक्कीच बोलणार”. 
 
बिग बॉस मराठी या कार्यक्रमामधील स्पर्धक तर चर्चेत आहेतच जसे अनिल थत्ते यांची थत्तेगिरी, मेघाची टास्क आणि बिग बॉस मराठी जिंकण्यासाठीची जिद्द, मेघा आणि रेशम मधील भांडण, भूषण आणि पुष्करचे संयम राखून खेळ खेळण, सई आणि पुष्करची मैत्री आणि घरामध्ये बनलेले दोन गट तसेच महेश मांजरेकर यांचा विकेंडचा डाव. आता वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन शर्मिष्ठा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यावर सदस्य नक्की काय बोलतील ? कसे तिचे स्वागत होईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

 
शर्मिष्ठाने घरातील सदस्य तसेच तिला कोण आवडते, कोणाशी मैत्री होईल ? महेश मांजरेकर तसेच विकेंडचा डाव याबद्दल देखील थोडं सांगितलं ती म्हणाली, “सध्या असलेल्या सदस्यांपैकी माझी मेघाशी चांगली आणि लगेच मैत्री होईल असे मला वाटते. मेघा आणि पुष्कर हे मला स्ट्राँग स्पर्धक वाटतात. स्पर्धा तर असणारच पण, मी येतानाच अंतिम सोहळ्याची तयारी करून आले आहे त्यामुळे नक्कीच तिथंपर्यंत जायला आवडेल. विकेंडचा डाव भागाबद्दल सांगायचं म्हणजे महेश सरांशी बोलायला पण भीती वाटते बाहेर इथे तर शाळा असणार आहे त्यामुळे जे ते सांगतील ते माझ्या चांगल्यासाठीच असेल, कारण ते जे सांगतील त्याद्वारे मला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळेल, त्यामुळे जे काही बोलतील ते मी चांगल्याच प्रकारे घेणार आहे.”

 

Web Title: Sharmishtha Raut says, in Bigg Boss house, I will play my independent game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.