सलमान-लुलियाने गुपचूप उरकला साखरपुडा?

By Admin | Published: October 19, 2015 01:04 PM2015-10-19T13:04:52+5:302015-10-19T14:24:05+5:30

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंटूर या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचे वृत्त आहे.

Salman-Luliyen Gupchup Urkala Sakharpuda? | सलमान-लुलियाने गुपचूप उरकला साखरपुडा?

सलमान-लुलियाने गुपचूप उरकला साखरपुडा?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान नेहमीच त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत राहिला आहे. आधी संगीत बिजलानी, मग विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, त्यानंतर कतरिना कैफ यांच्यासोबतची सलमानची प्रकरणं खूप गाजली, मात्र ती अयशस्वी ठरली. त्यानंतर ब-याच काळापासून सलमानचे नाव रोमानियन टीव्ही कलाकार लुलिया वंतूर हिच्याशी जोडले जात असून त्या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.  पिंकव्हिला डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस आणि प्रेम रतन धन पायोच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त असलेल्या सलमान आणि मॉडेल लुलियाने कोणताही गाजावाजा न करता एंगेजमेंट केली आहे. बहीण अर्पिताच्या लग्नादरम्यानच सलमानने आपल्या कुटुंबियांना लुलियाबद्दल सर्व काही सांगितल्याची चर्चा होती. त्याच्या एंगेजमेंटच्या वृत्तानंतर सलमानच्या कुटुंबियांनी त्याचे व लुलियाचे नाते स्वीकारल्याचे दिसत आहे.
सध्या लुलिया काही काळासाठी  रोमानियाला परतली असून तिचा व सलमानचा साखरपुडा आधीच झाला आहे आणि पुढील वर्षी दोघेही लग्नबंधनात अडकतील, अशी माहिती लुलियाच्या पीआरने दिली आहे. सलमानने मात्र साखरपुड्याच्या वृत्तावर अद्याप मौनच बाळगलेले आहे. 
 

Web Title: Salman-Luliyen Gupchup Urkala Sakharpuda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.