आमीरच्या 'दंगल'वर सलमानची प्रतिक्रिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 03:39 PM2016-11-02T15:39:51+5:302016-11-02T15:59:16+5:30

एकीकडे 'दंगल' चित्रपटाचा ट्रेलर सर्वांना आवडत असताना काही सीन्स सुलतान चित्रपटाशी मिळते-जुळते असल्याची चर्चाही सुरु आहे. सलमान खानदेखील 'दंगल'चा ट्रेलर पाहिल्यानंतर थोडा आश्चर्यचकित झाला.

Salman Khan's reaction to Amir's 'Dangal' | आमीरच्या 'दंगल'वर सलमानची प्रतिक्रिया...

आमीरच्या 'दंगल'वर सलमानची प्रतिक्रिया...

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाचा ट्रेलर सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. सर्वांनी आमीर खानचं भरभरुन कौतुक केलं आहे. या चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भुमिका साकारत आहे. एकीकडे चित्रपटाचा ट्रेलर सर्वांना आवडत असताना काही सीन्स सुलतान चित्रपटाशी मिळते-जुळते असल्याची चर्चाही सुरु आहे. धोबी-पछाड, स्कूटर यासारख्या अनेक गोष्टींमध्ये साम्य असल्याची चर्चा केली जात आहे. 
 
 
आमीर खानने 'सुलतान' चित्रपट पाहिल्यानंतर साम्य पाहून चिंताग्रस्त झाला होता. सलमान खानदेखील 'दंगल'चा ट्रेलर पाहिल्यानंतर थोडा आश्चर्यचकित झाला. दोन्ही चित्रपटांत अनेक गोष्टींमध्ये साम्य असल्याचं त्यालाही जाणवलं होतं.
 
(आमीर खानच्या 'दंगल'चं पोस्टर रिलीज) 
('दंगल'च्या शुटिंगदरम्यान आमीरला होती मृत्यूची भीती)
  
सलमान खान मनालीमध्ये 'ट्यूबलाईट' चित्रपटाचं शुटिंग करत असून त्यावेळी त्याने 'दंगल'चा ट्रेलर पाहिला. त्यावेळी स्कूटर आणि स्वेटर सीन एकदम सारखा असल्याचं त्यालाही जाणवलं.

पण सलमानने आमीर खानला चिंता करण्याचं कोणतंच कारण नसल्याचं म्हटलं आहे. 'आमीरला चिंता करण्याचं कारण नाही. त्याने चिंता का करावी. मी स्क्रिप्ट वाचलेली आहे, आणि ती उत्तम आहे. खरंतर मला संधी मिळाली असती तर मी दोन्ही चित्रपट केले असते. पहिला 'सुलतान' आणि दुसरा 'सुलतान का दंगल',' असं सलमानने म्हटलं आहे.
 

सलमान खान सध्या कबीर खान यांच्या 'ट्यूबलाईट' आणि 'एक था टायगर'च्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे. 'एक था टायगर'च्या सिक्वेलचं दिग्दर्शन अली अब्बास जाफर करत आहे. यामध्ये पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाला एकत्र पाहायला मिळणार आहे.
 
'दंगल' चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भुमिका साकारत असून हा  चित्रपट 23 डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.
 

Web Title: Salman Khan's reaction to Amir's 'Dangal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.