राजमौली यांनी अशाप्रकारे गुप्त ठेवली बाहुबली : 2 ची कहाणी

By Admin | Published: April 25, 2017 09:36 PM2017-04-25T21:36:51+5:302017-04-25T21:36:59+5:30

म्हणून बाहुबली - 2 च्या कथानकाबाबत अगदी शेवटपर्यंत गोपनियता बाळगण्यात दिग्दर्शक एसएस. राजमौली यशस्वी ठरले.

Rajmoula kept such a secret, Bahubali: 2 story | राजमौली यांनी अशाप्रकारे गुप्त ठेवली बाहुबली : 2 ची कहाणी

राजमौली यांनी अशाप्रकारे गुप्त ठेवली बाहुबली : 2 ची कहाणी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 -  डझनावारी कलाकार, शेकडो सहाय्यक कर्मचारी, चित्रिकरण पाहायला येणारे हजारे चाहते आणि सिनेमाबाबतची प्रत्येक गोष्ट वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उतावळी असलेली प्रसारमाध्यमे यांच्यापासून चित्रपटाचे कथानक, महत्त्वाची घटना लपवून ठेवणे तसे कठीणच. त्यात बाहुबलीसारख्या बहुचर्चित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे कथानक या मंडळींपासून लपवणे म्हणजे कर्मकठीण बाब. पण बाहुबली - 2 च्या कथानकाबाबत अगदी शेवटपर्यंत गोपनियता बाळगण्यात दिग्दर्शक एसएस राजमौली यशस्वी ठरले. अगदी कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तरही जंग जंग पछाडूनही कुणालाही अद्याप सापडलेले नाही. 
 
बाहुबली - 2 हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र  प्रदर्शन दोन दिवसांवर असतानाही या चित्रपटातील असदी जुजबी माहितीसुद्धा समोर आलेली नाही. चित्रपटाचे कथानक, त्यातील घटनाक्रम, क्लायमॅक्स प्रदर्शनापूर्वी उघड होऊ नये यासाठी राजमौली यांनी प्रचंड खबरदारी घेतल्यानेच हे शक्य झाले. चित्रपटाचे कथानक उघड होऊ नये यासाठी राजमौली यांनी या चित्रपटाच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या वाटून घेणाऱ्या टीममध्ये आपल्या कुटुंबीयांचाच समावेश केला होता. त्यात बाहेरच्या व्यकींचा कमीत कमी संबंध येईल याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळे बाहुबलीचे कथानक गुपितच राहिले.  
 
राजमौली यांच्या या नातेवाईकांचा आहे बाहुबलीच्या निर्मितीत सहभाग
 
विजयेंद्र प्रसाद (लेखक) - राजमौली यांचे वडील
एमएम किरावनी (संगीतकार) - राजमौली यांचे चुलतभाऊ
के. शिवशक्ती दत्ता (गीतकार) - विजयेंद्र प्रसाद यांचे चुलत भाऊ
के. रामाकृष्णा (गीतकार) - शिवशक्ती यांचे धाकटे भाऊ
कल्याणी मलिक (ध्वनी संकलक)  - किरावनी यांचा धाकटे भाऊ
श्री वल्ली (लाइन प्रोड्युसर) - कीरावनी यांची पत्नी
रामा राजमौली (वेशभूषा) - राजमौली यांची पत्नी
एसएस कार्तिकेय  (सेकंड युनिट डायरेक्टर) - राजमौली यांचा मुलगा
काल भैरव (गायक) - कीरावानी यांचे पुत्र
श्री सिंहा ( सहाय्यक संगीत निर्देशक) - कीरवानी यांचा घाकटा मुलगा 
राजबली (व्हीएफएक्स सहाय्यक) रामकृष्णा यांचे पुत्र
मयूर (व्हाइस फॉर बिट) - कल्याणी मलिक यांचे पुत्र
मयूका (कलाकार) - राजमौली यांची मुलगी
कुमदावती (कलाकार) कीरवानी यांची मुलगी  
 

Web Title: Rajmoula kept such a secret, Bahubali: 2 story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.