मिथुन चक्रवर्तीच्या मुलीने लावले सगळ्यांना वेड! सारा अली खान, जान्हवी कपूरला देतेय मात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 01:00 PM2018-05-29T13:00:14+5:302018-05-29T18:30:14+5:30

जान्हवी कपूर, सारा अली खान यासारखे नव्या पिढीतील स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याच्या तयारीत असताना आता एक ...

Mithun Chakrabarti girl wade everyone! Sarah Ali Khan, Janhavi Kapoor giving up! | मिथुन चक्रवर्तीच्या मुलीने लावले सगळ्यांना वेड! सारा अली खान, जान्हवी कपूरला देतेय मात!!

मिथुन चक्रवर्तीच्या मुलीने लावले सगळ्यांना वेड! सारा अली खान, जान्हवी कपूरला देतेय मात!!

googlenewsNext
न्हवी कपूर, सारा अली खान यासारखे नव्या पिढीतील स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याच्या तयारीत असताना आता एक आणखी एक स्टारकिड्स या शर्यतीत उतरण्यास सज्ज झाली आहे. होय, या स्टारकिड्सचे नाव आहे, दिशानी चक्रवर्ती.



आता या नावावरून दिशानीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. दिशानीची ओळख आम्ही याआधीही करून दिली आहे. दिशानी चक्रवर्ती म्हणजे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी.



गेल्या अनेक दिवसांपासून दिशानीच्या बॉलिवूड प्रवेशाच्या चर्चा आहेत. पण आता कदाचित ती योग्य वेळ आली आहे. हे आम्ही कशावरून म्हणतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यामागे एक कारण आहे. होय, दिशाना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेच. पण गेल्या काही दिवसांत ती सोशल मीडियावर आणखीच अ‍ॅक्टिव्ह झाली आहे.



सध्या दिशानी न्यूयॉर्कच्या एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवते आहे. मीडियाचे मानाल तर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यात ती सज्ज आहे. स्टाईल आणि सौंदर्याचे म्हणाल तर दिशानी सारा आणि जान्हवी या दोघींनाही मात देताना दिसतेय. आम्ही ऐकले त्यानुसार, दिशानी सलमानची खूप मोठी फॅन आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे, स्वत: सलमान हा मिथुन यांचा खूप मोठा चाहता आहे. आता दिशानी बॉॅलिवूडमध्ये कुणाच्या मदतीने आणि कशी जागा बनवते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.


आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल की, दिशानी ही मिथुन यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मिथुन यांना एका कचराकुंडीत  दिशानी सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंचीत फेकुन तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता.त्या रस्त्यावरून अनेकजण गेलेत. पण जीवाच्या आकांताने रडणा-या त्या चिमुकलीला पाहून कुणाचेही हृदय द्रवले नाही. एका बंगाली न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आणि मिथुनने नेमकी ही बातमी ऐकून या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.  

ALSO READ : ​कचराकुंडीत सापडली होती मिथुन चक्रवर्तीची मुलगी! आता दिसते अशी!!

या चिमुकलीला दत्तक घेतल्यानंतर मिथुनने तिचे नाव दिशानी ठेवले. मिथुनची पत्नी योगिता बाली हिनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले.

Web Title: Mithun Chakrabarti girl wade everyone! Sarah Ali Khan, Janhavi Kapoor giving up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.