अशी ही गुरुशिष्याची जोडी 'बॉईज'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 10:54 AM2017-09-04T10:54:26+5:302017-09-04T16:24:26+5:30

पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असणारा ‘बॉईज’ सिनेमा ८ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सुप्रीम मोशन ...

Such a pair of gurushey pair in 'Boys' | अशी ही गुरुशिष्याची जोडी 'बॉईज'मध्ये

अशी ही गुरुशिष्याची जोडी 'बॉईज'मध्ये

googlenewsNext
र्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असणारा ‘बॉईज’ सिनेमा ८ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित किशोरवयीन मुलांवर आधारित असलेल्या या चित्रपटात गुरु-शिष्याची अनोखी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हि जोडी आहे सिनेमाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते यांची! आज जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्याबद्दल इथे मांडण्यात येत आहे. 
वास्तविक जीवनात विशाल देवरुखकर अवधूतना आपले गुरु मानतात, अवधूत गुप्ते यांकडूनच मी दिग्दर्शनाचे धडे घेतले असल्याचे ते सांगतात.

अवधूत यांनी दिग्दर्शित केलेल्या झेंडा, मोरया, कान्हा तसेच एकूण पाच चित्रपटात विशाल यांनी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका केली होती. त्यामुळे आगामी 'बॉईज'या चीत्रपटामार्फत दिग्दर्शकीय पदार्पण करत असलेल्या विशाल यांना प्रोत्साहन देण्यासाठी अवधूत यांनी प्रस्तुतकर्त्याची जबादारी उचलली आहे. 'हा सिनेमा विशालने स्वत्रंत्र दिग्दर्शित केला असून, मी केवळ एक मार्गदर्शक आहे. त्याच्या कामात लुडबुड करणे मी टाळले. ह्या सिनेमाची रचना त्याचीच असून,सिनेमातील संगीताची आणि प्रस्तुतकर्त्याची जबाबदारी मी उचलली होती.' असे अवधूत गुप्ते सांगतात.

वयात येणाऱ्या मुलांची मानसिकता, त्यांची वैचारिक आणि आकलन क्षमता, तसेच स्वभावगुणाचे पैलू मांडणारा हा सिनेमा, नवतरुणांसाठी पर्वणी ठरणार आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड अशी तीन खोडकर पोरं या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सनी लिओनीची लावणी आकर्षणचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या संगीत म्युझिक लाँच ही सनी लिओनी आली होती. 

Web Title: Such a pair of gurushey pair in 'Boys'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.