लेकीला अभिनेत्री करण्यासाठी आईच बनली गीतकार, निर्माती,‘नादावला जीव’ व्हिडीओ साँगला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 07:00 AM2017-12-16T07:00:33+5:302017-12-16T12:30:33+5:30

युट्यूबवर नादावला जीव हे व्हिडीओ साँग संगीतप्रेमींच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

Lekhi likes to become a mother to songwriter, producer, 'Nadavla Jeev' | लेकीला अभिनेत्री करण्यासाठी आईच बनली गीतकार, निर्माती,‘नादावला जीव’ व्हिडीओ साँगला पसंती

लेकीला अभिनेत्री करण्यासाठी आईच बनली गीतकार, निर्माती,‘नादावला जीव’ व्हिडीओ साँगला पसंती

googlenewsNext
्याचा जमाना सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनचा आहे. या माध्यमातून अनेक जण आपल्या आवडत्या कला जोपासतात. आपल्या कलेचं दर्शन जगाला घडवून देण्यासाठी आजच्या युगातली ही माध्यमं बरीच हिट ठरत आहेत. कुणी आपला व्हीडीओ बनवतं तर कुणी सूरेल आवाजातील गाणं सोशल मीडियावर पोस्ट करतो. या व्हिडीओला किंवा पोस्टला तात्काळ हिट्स मिळतात आणि संबंधित व्यक्ती लगेच चर्चेत येते ही सोशल मीडियाची ताकद आहे. यामुळे काही जण सिक्रेट सुपरस्टार बनत जगासमोर येतात. मात्र समाजात अशा काही व्यक्ती आहेत त्यांना कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. असंच काहीसं घडलं अहमदनगच्या अर्पिता साळवेबाबत. तिला शालेय जीवनापासूनच डान्स आणि गाण्याची आवड होती. अभिनयाच्या दुनियेत काम करण्याचं अर्पिताचं स्वप्न होतं. यासाठी तिच्या घरच्यांनी तिला पाठिंबा दिला. मालिका आणि सिनेमाच्या ऑडिशन्स तिने दिल्या. मात्र कुठे ना कुठे घोडे अडलं. एका मराठी सिनेमासाठी संधी तिला मिळाली मात्र अभिनेत्री व्हायचं असेल तर पैसे द्यावे लागतील असं दिग्दर्शकाकडून अर्पिताला सांगण्यात आलं. त्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी पैसा आणि ओळख हवीच ही बाब साळवे कुटुंबीयांच्या लक्षात आली. मात्र यामुळे अर्पिताच्या आई शुभांगी मात्र बिल्कुल खचल्या नाहीत. घरकाम करत करत त्यांना कविता करण्याचा छंद होता. आपल्या लेकीला नायिका बनवण्यासाठी आपणच काही तरी करायला हवं हे त्या माऊलीला समजलं. शुभांगी यांनी आपल्या मुलीसाठी मग नादावला जीव हे गाणं लिहिलं. या गाण्याचा व्हिडीओ करायचा आणि त्याच मुलगी अर्पिताला अभिनयाची संधी द्यायची असं त्यांनी ठरवलं. मात्र गाणं शूट करायचं म्हटलं की लोकेशन साउंड, ध्वनीमुद्रण, रेकॉर्डिंग, मिक्सिंग, स्टुडिओ अशा अनेक गोष्टी आल्या. याबाबत शुभांगी यांना काहीही माहिती नव्हतं. त्यांनी या सगळ्या तांत्रिक बाबींची माहिती घेण्यासाठी इंटरनेटचा वापर केला. स्टुडिओचा नंबरही त्यांनी इंटरनेवर मिळवला. शूटिंगसाठी बरेच व्हिडीओ पाहिल्यानंतर ते गाणं अहमदनगरमध्येच शूट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लेक अर्पिताला त्यांनी डान्सचे धडे घेण्यास पाठवलं. ब-याच गोष्टींची इथून तिथून जुळवाजुळव करत अखेर नादावला जीव या व्हिडीओ साँगचे शूटिंग पार पडलं. नगरच्या राज पॅलेस हॉटेलमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं. या गाण्यातील सर्व कलाकार आणि इतर टीम नगरचीच आहे. युट्यूबवर नादावला जीव हे व्हिडीओ साँग संगीतप्रेमींच्या पसंतीस पात्र ठरत आहे. आपल्या लेकीचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक आई गीतकार, निर्माती बनली आणि तिचा हा प्रेरणादायी संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

Web Title: Lekhi likes to become a mother to songwriter, producer, 'Nadavla Jeev'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.