हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 03:46 PM2018-10-15T15:46:10+5:302018-10-15T15:46:38+5:30

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hindu-Muslim unity based on 'Sultan Shambhu Subhedar' | हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार'

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार'

googlenewsNext
ठळक मुद्देहिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल भाष्य करणारा 'सुलतान शंभू सुभेदार' चित्रपट

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. त्याला कल्पनेची जोड देत अॅड. प्रशांत भेलांडे यांनी कथा रेखाटली आहे. 

'सुलतान शंभू सुभेदार' चित्रपट हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल भाष्य करणारा आहे. डॉ. राज माने दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती कैलास गिरोळकर व अॅड. प्रशांत भेलांडे यांनी यश असोसिएट मुव्हीज या बॅनरखाली केली आहे. मनोरंजनासोबतच एक सशक्त सामाजिक संदेश या सिनेमात देण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. राज माने म्हणाले की, ''सुलतान शंभू सुभेदार' या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. त्याला कल्पनेची जोड देत अॅड. प्रशांत भेलांडे यांनी कथा रेखाटली आहे. ही कथा एका मुस्लीम कुटुंबातील हरवलेल्या सुलतानची आहे. ज्याचे पालनपोषण एक हिंदू रिक्षाचालक शंभू सुभेदार करतो. आयुष्याच्या एका वळणावर या दोघांची भेट होते आणि तिथूनच शंभूचे विश्व बदलून जाते. दोघे आनंदाने जगत असतात. आयुष्याच्या एका वळणावर सुलतानचे जन्मदाते उभे ठाकतात. त्यानंतर सुलतानचे काय होते? ते या चित्रपटात पाहायला मिळेल.'
यश गिरोळकर, दिगंबर नाईक, किशोर महाबोले, देवेंद्र दोडके, जयवंत भालेकर, अॅड. प्रशांत भेलांडे, उज्वला गाडे, सिमरन कपूर, सुप्रिया बर्वे, ज्योती निसळ यांच्या सिनेमात भूमिका आहेत. गीतकार अॅड. प्रशांत भेलांडे यांनी लिहिलेल्या गीतरचना संगीतकार अरविंद हसबनीस यांनी धनश्री देशपांडे, डॉ. डहाणे, श्रीरंग भाले यांच्या आवाजात स्वरबद्ध केल्या आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Hindu-Muslim unity based on 'Sultan Shambhu Subhedar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.