'बॉईज 2'ला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 03:58 PM2018-10-05T15:58:57+5:302018-10-05T15:59:33+5:30

'बॉईज' चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता त्याचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तिकिटबारीवर गर्दी पाहायला मिळाली.

A good response from the audience to 'Boyz 2' | 'बॉईज 2'ला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

'बॉईज 2'ला मिळतोय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देधैर्या, ढुंग्या आणि कबीरची धमालमस्ती


'बॉईज' चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता त्याचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तिकिटबारीवर गर्दी पाहायला मिळाली. तर बऱ्याच ठिकाणचे शोज हाऊसफुल आहेत. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची धमालमस्ती या सिनेमात पाहायला मिळते आहे. त्यामुळे महाविद्यालयातील तरूणांनी हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे.

महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित 'बॉईज 2' सिनेमात प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी  आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाद देखील पाहायला मिळतो आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या कलाकारांसोबत ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील आपल्याला या ट्रेलरमध्ये दिसून येत आहेत. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांचीदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. 
इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या 'बॉईज २' सिनेमाचा हा दमदार ट्रेलर रसिकांचे तुफान मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. विशाल देवरुखकर यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने केले आहे. तसेच या तीन अतरंगी मुलांचा दंगा इरॉस इंटरनॅशनलद्वारे जागतिक स्तरावरदेखील वितरीत केला जाणार असल्याकारणामुळे 'बॉईज २' चा 'नॉईस' भारताबाहेरच्या प्रेक्षकांनादेखील अनुभवता येणार आहे.

Web Title: A good response from the audience to 'Boyz 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.