एका वेगळ्या थाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 09:12 AM2017-09-04T09:12:41+5:302017-09-04T14:42:41+5:30

नविन निर्माता, नविन कलाकार, चित्रपटाचे दमदार कथानक, कमी बजेट त्यात कोणाचेही पाठबळ नाही, चित्रपटसृष्टीत बरे वाईट अनुभव आलेले असतानाही ...

A different audience meeting with the audience of the film | एका वेगळ्या थाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

एका वेगळ्या थाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">नविन निर्माता, नविन कलाकार, चित्रपटाचे दमदार कथानक, कमी बजेट त्यात कोणाचेही पाठबळ नाही, चित्रपटसृष्टीत बरे वाईट अनुभव आलेले असतानाही चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस करायचे होते. मोजक्याच पण मराठी प्रेक्षकवर्ग असलेली चित्रपटगृहे फास्ट ट्रक एनटरटेनमेंट कंपनी या चित्रपट वितरण कंपनीने दिल्यामुळे के. के. व्हिजन मुक्ता पेण, रायगड येथील मल्टीफ्लेक्स मध्ये प्रदर्शित झालेला व्यसन हा चित्रपट हाऊसफुल गर्दीत चालला आहे. शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सर्व खेळाना हाऊसफुलचा बोर्ड लागला होता. बऱ्याच दिवसांनी अडव्हांस बुकींगमध्ये. व्यसन या मराठी चित्रपटामुळे हाऊसफुलचा बोर्ड पहायला मिळाला असे थिअटर व्यवस्थापन यांच्याकडून सांगण्यात आले. श्रीयश म्युझिक प्रोडक्शन च्या ब्याणार खाली चित्रपटाची निर्मिती जितेंद्र मुंडकर यांनी केली आहे. दिग्दर्शक रुपेश मुंडकर यांनी प्रथमच दिग्दर्शन केले आहे. व्यसन या चित्रपटाचे निर्माते जितेंद्र मुंडकर यांनी या यशाचे श्रेय दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतील अनुभवी दिग्दर्शक राज मोहिते यांच्या योग्य मार्गदर्शना मुळे मिळाले असे सांगितले. व्यसनाचे दुष्परिणाम मी जवळून पाहिले आहेत त्यामुळे हि कथा सुचली. चित्रपट बनविण्याचा अनुभव नव्हता पण जिद्द होती-  खुप शिकण्यास मिळाले पण योग्य ती माणसे मिळाली पाहिजेत. जितेंद्र मुअसे सांगितले. दिग्दर्शक रूपेश मुंडकर यांनी रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे हे यश मिळाले मी त्यांचा आभारी आहे. पटकथा व संवाद अमोल सोनावणे , शंकर शेडगे यांच्या समवेत जितेंद्र मुंडकर यांनी लिहिले आहेत. अमोल सोनावणे, डॉ. रवी तेरकर, शरद पवार , नाव्हाकर सर यांच्या गीतांना कुणाल – करण , शरद पवार , कबीर यांनी संगीत दिले आहे - व्यसन या चित्रपटात जयराज नायर, वृषाली हाटळकर, अमित शिंगटे, जितेंद्र मुंडकर, अरविंद वाघमारे, प्रदीप पटवर्धन, वाजीद अन्सारी , शंकर शेडगे बालकलाकार नितेश डोखे ,निकेश मुंडकर आदि बऱ्याच कलाकारांच्या महत्वांच्या भूमिका आहेत.

Web Title: A different audience meeting with the audience of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.