मृण्मयी देशपांडेचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिला आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:37 PM2018-12-17T12:37:19+5:302018-12-17T12:42:19+5:30

या फोटोतील तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे. मॉर्डन ड्रेसमध्ये मृण्मयीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

DID U SAW MRUNMAYEE DESHPANDE’S GLAMROUS LOOK ? | मृण्मयी देशपांडेचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिला आहे का ?

मृण्मयी देशपांडेचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिला आहे का ?

googlenewsNext

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

या फोटोतील तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे. मॉर्डन ड्रेसमध्ये मृण्मयीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. या ग्लॅमरस फोटोसह मृण्मयी विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

विशेष म्हणजे तिची फर्जद सिनेमातील भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती. मृण्मयीने त्यासाठी 15 दिवस दररोज चार तास तलवारबाजीचा सराव केला होता. याशिवाय कट्यार काळजात घुसली' , नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.  

 

Web Title: DID U SAW MRUNMAYEE DESHPANDE’S GLAMROUS LOOK ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.