धैर्या, ढुंग्या आणि कबीर 'बॉईज २' मध्येदेखील करणार दंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 01:16 PM2018-08-28T13:16:30+5:302018-08-28T13:19:21+5:30

'आम्ही लग्नाळू' म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने चांगलीच भुरळ पाडली होती. आता हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे.

Dhairya, Dhungia and Kabir will do fun in 'Boyz 2' | धैर्या, ढुंग्या आणि कबीर 'बॉईज २' मध्येदेखील करणार दंगा

धैर्या, ढुंग्या आणि कबीर 'बॉईज २' मध्येदेखील करणार दंगा

googlenewsNext
ठळक मुद्दे'बॉईज २' ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीलासुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड पुन्हा एकदा करणार धमाल

गावाकडच्या धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी 'बॉईज २' मध्येदेखील दिसून येणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट एण्टरटेंन्मेंट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' असे टॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर 'बॉईज' सिनेमातील तीच अतरंगी पोरे आपल्याला दिसून येत आहेत. शाळेतून आता महाविद्यालयात गेलेल्या या तिघांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मार जरी दिसत असला तरी, त्यांची मस्ती अजून काही कमी झाली नसल्याचे, त्यांच्या हास्यातून कळून येते. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमातून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा डबल धमाका घेऊन येत आहेत. 

येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने लिहिले असून, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. तसेच, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे. 
तीन मित्रांची रंजक दुनिया दाखवणाऱ्या, या सुपरहिट सिनेमाच्या दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार? याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. मोठ्या पडद्यावरील 'बॉईज'च्या या पुनरागमनला चाहते भरघोस प्रतिसाद देतील, अशी आशादेखील व्यक्त होत आहे. 

Web Title: Dhairya, Dhungia and Kabir will do fun in 'Boyz 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.