गायिका अमृता नातूचे संगीत दिग्दर्शनात पदार्पण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 05:01 AM2017-12-04T05:01:10+5:302017-12-04T10:31:10+5:30

चित्रपटगीते, अल्बम  आणि मालिकांची शिर्षक गीते अशी अनेक सुपरहिट गाणी गायिका अमृता नातूने गायली आहेत.आता एक पाऊल पुढे टाकत ...

Debut of Amrita Natu's music director !! | गायिका अमृता नातूचे संगीत दिग्दर्शनात पदार्पण!!

गायिका अमृता नातूचे संगीत दिग्दर्शनात पदार्पण!!

googlenewsNext

/>चित्रपटगीते, अल्बम  आणि मालिकांची शिर्षक गीते अशी अनेक सुपरहिट गाणी गायिका अमृता नातूने गायली आहेत.आता एक पाऊल पुढे टाकत अमृताने आपल्या करिअरची एक वेगळी सुरूवात केली आहे. आता अमृता संगीतकारही बनली आहे. तिने संगीत दिलेल्या 'उषाच्या ओव्या' या आध्यात्मिक गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन नुकतंच पं. सुरेश वाडकर यांच्या हस्ते झालं. अल्बम प्रकाशनाविषयी अमृता म्हणते, पं.सुरेश वाडकरांशी अनेक वर्षांपासून माझा परिचय आहे.त्यामुळे संगीतकार म्हणून पहिल्यांदाच पाऊल टाकताना मला त्यांचा आशीर्वाद हवाच होता. त्यांच्या हातून हे प्रकाशन व्हावं अशी माझी मनोमन इच्छा होती. त्यांनी केवळ प्रकाशनच केलं नाही तर शांतपणे सगळी गाणीही ऐकली.

या अल्बमचं नाव ‘उषाच्या ओव्या’ असं असून डॉ. उषा हिरानंदानी यांच्या ‘आरंभ’ नावाच्या फिलासॉफिकल काव्यसंग्रहातून त्यातील काही कविता घेण्यात आल्या आहेत. अमृता नातू आणि गौरव बांगिया यांनी यातली गाणी गायली असून संगीतही या दोघांनी दिले आहे. ही सर्व अाध्यात्मिक गाणी आहेत, पण धार्मिक नाहीत. म्हणजे कोणत्याही एखाद्या देवाची किंवा धर्माची ही गाणी नाहीत, असे अमृताने स्पष्ट केले. संतोष नायर यांनी या अल्बमची अरेंजमेंट केली आहे.

सध्याच्या काळात जेथे फक्त लाऊड म्युझिकलाच भर दिला जातो त्या काळात दोन तरुण मुलं येतात आणि शांत, आध्यात्मिक गाणी देतात ही कौतुकाची बाब आहे. मेडीटेशनला बसल्यावर जसं संगीत ऐकलं जातं तसंच हे संगीत आहे. असे पं. सुरेश वाडकर यांनी सांगितले.मी गाण्यांना चालही लावू शकते हा माझ्यासाठीही एक साक्षात्कार होता. या अल्बममध्ये एकूण सहा गाणी आहेत. संगीतकार म्हणून अनुभव सांगताना अमृता म्हणते, अनुभव खूप एक्सायटेड होता. गायिका म्हणून मी फक्त माझ्या आवाजावर लक्ष केंद्रीत करायचे, पण एक संगीतकार म्हणून मला ती कविता आधी जाणून घ्यावी लागली. त्यातलं मर्म जाणून घ्यावं लागलं. हा अनुभव खूप मजेदार असल्याचे अमृताने सांगितले.

Web Title: Debut of Amrita Natu's music director !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.