एका घटनेमुळे सुचली 'बॉईज २'ची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:45 PM2018-09-05T14:45:18+5:302018-09-06T06:30:00+5:30

'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर येत्या ५ ऑक्टोबरला या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Boyz 2 movie story idea | एका घटनेमुळे सुचली 'बॉईज २'ची गोष्ट

एका घटनेमुळे सुचली 'बॉईज २'ची गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविद्यालयीन जगात रमलेल्या बॉईजची कथा 'बॉईज २'मध्ये

'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या सिक्वलची चर्चा मोठ्या प्रमाणात सगळीकडे रंगली आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज २' मध्येदेखील बॉईजची तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे. मात्र, या सिनेमाची गोष्ट एका घटनेने सुचली असल्याचे विशाल देवरुखकर सांगतात. 


'बॉईज'च्या सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणेदेखील गरजेचे होते, त्यासाठी तोडीस तोड अशा विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हते. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला आणि त्यातूनच 'बॉईज २' ची गोष्ट आम्हाला सापडली', असे विशाल देवरुखकर यांनी सांगितले. 
अवघ्या दोन-तीन तासासाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर विशाल यांची इतकी अवस्था वाईट होऊ शकते, तर कॉलेज तरुणासाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल? असा प्रश्न विशाल यांना पडला. त्यांनी लागलीच हा विचार ऋषीकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशनेदेखील त्याला पसंती देत 'बॉईज २' चे लिखाण सुरु केले. या अनावधाने सुचलेल्या 'बॉईज २' चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या 'बॉईज' ची धम्माल पाहायला मिळणार आहे. 
इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Boyz 2 movie story idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.