'बॉईज' ची अशी आहेत पॅशनेट पोरं !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 07:17 AM2017-08-31T07:17:49+5:302017-08-31T12:47:49+5:30

किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणारा 'बॉईज' हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. वयात येणाऱ्या मुलांची मानसिकता, ...

'Boys' are like this! | 'बॉईज' ची अशी आहेत पॅशनेट पोरं !

'बॉईज' ची अशी आहेत पॅशनेट पोरं !

googlenewsNext
शोरवयीन मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणारा 'बॉईज' हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. वयात येणाऱ्या मुलांची मानसिकता, त्यांची वैचारिक आणि आकलन क्षमता, तसेच स्वभावगुणाचे पैलू मांडणारा हा सिनेमा, नवतरुणांसाठी पर्वणी ठरणार आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड अशी तीन खोडकर पोरं या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सिनेमातील त्यांची मैत्री वास्तविक जीवनातदेखील अगदी तशीच घट्ट असून, या तिघांनी सेटवर भरपूर खोड्या केल्या असल्याचे म्हंटले जाते. मात्र, असे असले तरी, हे तिघेजण आपल्या कामाबाबत खूप सजग आणि गंभीर देखील होती.पार्थ, सुमंत आणि प्रतिक या तिघांना आपल्याच वयातील मुलांची भूमिका सिनेमात करायची असल्याकारणामुळे, दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी त्यांना सेटवर स्वच्छंद फिरण्याची चांगलीच सूट दिली होती. मात्र याचा गैरफायदा न घेता, ह्या तिघांनी अगदी शिस्तबद्धपद्धतीने आपला अभिनय पूर्ण केला. 'बॉईज' सिनेमातील या पॅशनेटींग 'बॉईज'ची एक आठवण विशाल यांनी सांगितली.या सिनेमातील काही सिनचे चित्रीकरण पुण्यापासून दूर भोर गावात होते. शहरापासून दूर जंगलात शूट असल्याकारणामुळे तिथे खाण्यापिण्याची काहीच सोय नव्हती. त्यामुळे संपूर्ण युनिटला प्रत्येकवेळी शहरापासून लोकेशनपर्यंत गाडीने येणे जाणे करावे लागत होते. शिवाय रस्ता देखील कच्चा असल्याकारणामुळे, तिथे पोहोचायला विलंब देखील होत असे. अश्यावेळी चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवसात, दिग्दर्शकांना सूर्यास्तचा सीन शूट करायचा होता. मात्र, रस्ता खराब असल्यामुळे सूर्यास्ताच्याआधी सदर ठिकाणी पोहोचणे अशक्य झाले होते. त्यामुळे संपूर्ण युनिटसोबत आणखीन एक दिवस भोरचा मोठा पल्ला गाठावा लागणार होता. मात्र सुमंत, पार्थ आणि प्रतिकने चीत्रीकरण त्याचदिवशी पूर्ण करण्याच्या चंग बांधला होता. त्यासाठी या तिघांनी गाडीतून उतरत आपले सामान पाठीशी घेत लोकेशनपर्यंतचे अंतर पायी तुडवत गेले. सूर्यास्ताच्या आत लोकेशनवर पोहोचण्यासाठी या पोरांनी धावत जात, झाडांच्या आडोश्यात झटपट कपडे बदलत सिनसाठी तयारी केली. आणि या धावपळीत चित्रित झालेला हा सीन, सिनेमातील सर्वोत्कृष्ट सीन ठरला असल्याचे विशाल सांगतात.सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित ह्या सिनेमाची अवधूत गुप्ते प्रस्तुतकर्ते असून, मैत्री, प्रेम, शाळा आणि अभ्यास या चार भिंतीतील किशोरवयीन मुलांची रंगीत दुनिया आपल्याला 'बॉईज' मध्ये पाहायला मिळणार आहे. 

Web Title: 'Boys' are like this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.