अभिनेत्री रीना अग्रवालची मलेशिया सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 12:05 PM2017-09-04T12:05:18+5:302017-09-04T17:35:18+5:30

जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय. बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीतले कलाकारही अपवाद राहिलेलं नाही.नेहमीच्या शूटिंगच्या बिझी शेड्युअलमुळे स्वतःसाठी ...

Actress Reena Agarwal's Malaysia Tour | अभिनेत्री रीना अग्रवालची मलेशिया सफर

अभिनेत्री रीना अग्रवालची मलेशिया सफर

googlenewsNext
भरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय. बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीतले कलाकारही अपवाद राहिलेलं नाही.नेहमीच्या शूटिंगच्या बिझी शेड्युअलमुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही.रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विसावा हवा असतो,परंतू थोडीशी जरी उसंत मिळाली तर  कलाकार काही ना काही कलांना वाव देत त्यांचे छंद जोपासत असतात.अभिनेत्री  रीनानेसुद्धा आगामी चित्रपट 'देव देव्हाऱ्यात नाही' या चित्रीकरणातून जरासा वेळ काढत आपला पर्यटनाचा छंद जोपासला. त्यासाठी तिने थेट मलेशिया गाठलं.मलेशियातील मुक्काम पोस्ट 'लंकावी आणि 'कोलालंप्पूर'या स्थळांना भेट दिली.लंकावीमध्ये पहिल्यांदाच स्नोर्केलिंग आणि अंडर वाॅटर वर्ल्ड सफारीची मज्जा रीनाने लुटली.आता परदेशात जाणार म्हणजे खवय्येगिरी तर होणारच. तिथे रीनाने मलेशियातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.बाटू केव्हमधली हिंदू मंदिर अतिशय अविस्मरणीय स्थळ आहे असे रीना सांगते. तुमचा देखील मलेशियात भटकंतीसाठी जाण्याचा प्लॅन असेल तर, रीनाने पर्यटकांसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. ती सांगते, 'जर तुम्ही लंकावीमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर लोकल टॅक्सीऐवजी उबेर बुक करू शकता. प्रवास करण्यासाठी ते जास्त सोयीस्कर पडेल. तसेच कोलालंप्पूरमध्ये ज्या लोकल बसेस आहेत त्याचा पुरेपूर प्रवास करण्यासाठी उपयोग करावा असे रिनाने सांगितले.





अजिंठा चित्रपटातून फिल्म करिअरची सुरुवात करणारी रिना अग्रवाल नेहमीच वेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचली आहे.वास्ताविक जीवनातले राहणीमान आणि विचारसरणींपेक्षा अतिशय वेगळे रोल तिने स्वीकारले आहेत.कोणत्याही कलाकाराला एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेसाठी आपल्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टींमध्ये बदल कराण्याची गरज असते.भूमिकेसाठी लागणारी भाषा, राहणीमान, पेहराव या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात.आणि रिनाने नेहमीच तिच्या भूमिकांना ह्या सगळ्या गोष्टींद्वारे शंभर टक्के न्याय दिला आहे. रिनाने मराठीसोबतच हिंदीतही आपली ओळख निर्माण केली. “तलाश” या हिंदी सिनेमात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर हिंदी मालिका “एजंट राघव” मध्येही ती झळकली. पण नुकत्याच आलेल्या “कलर्स मराठी” वरील एका जाहिरातीतला तिचा टॅक्सी ड्राइव्हरचा लूक 

Web Title: Actress Reena Agarwal's Malaysia Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.