अभिनेते श्रीरंग देशमुख दिसणार आता ह्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 08:00 AM2018-12-17T08:00:00+5:302018-12-17T08:00:00+5:30

‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे.

Actor Shrirang Deshmukh will now appear in this role | अभिनेते श्रीरंग देशमुख दिसणार आता ह्या भूमिकेत

अभिनेते श्रीरंग देशमुख दिसणार आता ह्या भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात करणार पदार्पण

मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी या आगामी चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केले आहे. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विविधांगी भूमिका लीलया साकारणाऱ्या श्रीरंग देशमुख यांनी या चित्रपटाला दिग्दर्शकीय स्पर्श कसा दिला आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आत्ताच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते तेव्हा समाज आणि कुटुंब तो स्वीकारतो का? ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. ‘माणसाने आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयावर आयुष्याचे घडणे अथवा बिघडणे अवलंबून असते. तो एक निर्णय माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो. याच अनुषंगाने एक कथा मी लिहिली, आणि आता ती ‘एक निर्णय’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ज्यांना आयुष्यात स्वतःसाठी एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्यांनी अजून तो घेतला नाही त्या सगळ्यांसाठीच हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल असा विश्वास श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केला.

‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत कुंजिका काळवींट हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती सुरात बांधली आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडेंचे असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक याचे असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. राहुल खंडारे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 

Web Title: Actor Shrirang Deshmukh will now appear in this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.