अभिषेक देशमुखचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, 'होम स्वीट होम' सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 11:13 AM2018-08-16T11:13:10+5:302018-08-16T11:17:11+5:30

छोट्या पडद्यावरील मालिका 'पसंत आहे मुलगी'मध्ये पुनर्वसूच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिषेक देशमुख आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

Abhishek Deshmukh's silver screen debut, important role in 'Home Sweet Home' film | अभिषेक देशमुखचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, 'होम स्वीट होम' सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

अभिषेक देशमुखचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, 'होम स्वीट होम' सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे'होम स्वीट होम' चित्रपटात अभिषेक दिसणार महत्त्वाच्या भूमिकेतअभिषेक 'होम स्वीट होम' चित्रपटाबाबत उत्सुक

छोट्या पडद्यावरील मालिका 'पसंत आहे मुलगी'मध्ये पुनर्वसूच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिषेक देशमुख आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. तो 'होम स्वीट होम' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्री रिमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातून लेखक, अभिनेते हृषिकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. 

घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवे असते, याच घराविषयी आणि घरातील नात्यांवर 'होम स्वीट होम' चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाबाबत अभिषेक खूप उत्सुक असून याबद्दल सांगितले की,'या चित्रपटात मोहन जोशी व रिमा लागू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि मी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबद्दल मी आता सांगू शकत नाही. पण, प्रेक्षकांसाठी हे सरप्राईज ठरणार आहे. माझी मालिका पसंत आहे मुलगी संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या महिन्यात या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. या चित्रपटात खूप चांगले कलाकार आहेत. हृषिकेश जोशी यांनी पात्र खूप छान समजावून सांगितले. ते स्वतः अभिनेते असल्यामुळे कलाकारांना पात्र समजावून कसे सांगायचे हे त्यांना चांगले माहित आहे. त्यामुळे भूमिकेच्या सादरीकरणासाठी काय गरजेचे आहे, हे त्यांनी बरोबर समजावून सांगितले. त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली. या सिनेमाचा अनुभव खूपच छान होता.'

रिमा यांच्याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला की,' रिमा यांच्यासोबत माझे काही सीन नव्हते. पण, एका सेटवर असल्यामुळे आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या. त्या खूप प्रेमळ व मनमिळाऊ होत्या. त्यांच्यासोबत सेटवर मारलेल्या गप्पा अविस्मरणीय आहेत.'

अभिषेक आणखीन दोन मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्यातील एक म्हणजे माधुरी दीक्षित निर्मिती व स्वप्ननील जयकर दिग्दर्शित '15 ऑगस्ट' आणि दुसरा चित्रपट म्हणजे रोहित शेट्टी निर्मिती करीत असलेल्या पहिल्या मराठी चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'होम स्वीट होम' या चित्रपटात अभिषेक कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अभिषेक व रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’मध्ये आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Abhishek Deshmukh's silver screen debut, important role in 'Home Sweet Home' film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.