लँड १८५७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 04:07 AM2018-04-26T04:07:16+5:302018-04-26T09:37:16+5:30

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजवर अनेक सिनेमे येऊन गेले, पण शे ती व्यवसाय सोडून शेतकरी आणि गावकरी यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा ...

Land 1857 soon to meet the audience | लँड १८५७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

लँड १८५७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
तकऱ्यांच्या प्रश्नावर आजवर अनेक सिनेमे येऊन गेले, पण शे ती व्यवसाय सोडून शेतकरी आणि गावकरी यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा सिनेमा आजवर नाही आला. विजयालक्ष्मी फिल्म प्रॉडक्शन निर्मिती संस्थे अंतर्गत, विजयालक्ष्मी निर्मित, सुधीर दिग्दर्शित लँड १८५७ नावाचा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

निर्मात्या विजयालक्ष्मी यांनी यापूर्वी दोन शॉर्ट फिल्मची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे, त्या दोन्ही शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. या सिनेमाबाबत त्या सांगतात कि,  शेतकऱ्यांच्या जमिनीलगत आणि घरालगत मोठा महामार्ग तयार होण्याची अधिसूचना गावात आल्याने सर्व गावकरी कसे आनंदित होतात पुढे अनेक मजेशीर गोष्टी सिनेमात घडत जातात..पण पुढे नेमके काय होते ते हा सिनेमा बघितल्यावरच समजेल.

सिनेमात जयंत सावरकर,मुख्य भूमिकेत विठ्ठल काळे तर नकारात्मक भूमिकेत अनिल नगरकर, शशांक शेंडे,व नगरकरांचे साथीदार म्हणून सागर सुरवसे व सूरज यादव यांच्या भूमिका आहेत, तर राहुल फलटणकर, विश्वास सकट, मानिणी दुर्गे यांच्या देखील लक्षवेधी भूमिका असून. पार्श्वसंगीत रोहित नागभिडे, संगीत पंकज पडघम आणि अभिजित बारटक्के तर सहनिर्माते युवराज कुंभार आहेत. सिनेमात एकूण दोन गाणी आहेत. नकुल तळवलकर यांनी या सिनेमाचे ध्वनी संयोजन केले आहे. विनोदी अंगाने जाणाऱ्या या सिनेमाच्या गोष्टीत प्रेमी युगलाचे देखील उपकथानक आहे. म्हणजे संपूर्ण मनोरजंन यात असणार आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,तेव्हा सज्ज रहा हसायला.

Web Title: Land 1857 soon to meet the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.