‘ख्वाडा’ चित्रपटाची ‘कार्टून्स’द्वारे प्रसिद्धी

By Admin | Published: October 1, 2015 01:30 AM2015-10-01T01:30:03+5:302015-10-01T01:30:03+5:30

‘विविध शकला लढवून मार्केटिंगचा नवा टे्रंड आता मराठी चित्रपटसृष्टीमध्येही वाढत आहे. ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशन अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.

'Khwada' movie 'cartoons' publicity through | ‘ख्वाडा’ चित्रपटाची ‘कार्टून्स’द्वारे प्रसिद्धी

‘ख्वाडा’ चित्रपटाची ‘कार्टून्स’द्वारे प्रसिद्धी

googlenewsNext

‘विविध शकला लढवून मार्केटिंगचा नवा टे्रंड आता मराठी चित्रपटसृष्टीमध्येही वाढत आहे. ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशन अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे प्रमोशन हे याचे उत्तम उदाहरण आहे. विसर्जनाला चाललेला गणपती बाप्प्पा म्हणतो, ‘‘अरे ‘ख्वाडा’ बघायचा राहिलाच की! पण तुम्ही बघायला विसरू नका!’’ या कार्टून पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार उदय मोहिते यांनी काढलेले हे व्यंगचित्र फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर, व्हॉट्सपवर अनेक ग्रुपवर फिरू लागले आहे. ‘ख्वाडा’ची भन्नाट आयडियांच्याद्वारे अभिनव पद्धतीने जोरदार प्रसिद्धी सुरू आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी लालबाग राजाच्याचरणी अर्पण करून, चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पोस्टर प्रसिद्ध डिझायनर किरण चांदोरकर यांनी साकारले आहे. त्यानंतर अहमदनगर आणि बार्शी भागात बैलपोळ्याला बैलांच्या पाठीवर ‘ख्वाडा’ रंगवून काढलेली मिरवणूक चांगलीच गाजली. आता कार्टून फिरताना दिसत आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि सामाजिक गोष्टींचा संदर्भ घेऊन ‘ख्वाडा’साठी व्यंगचित्रं काढली जाणार आहेत. फेसबुकवर फोटोपेक्षा चित्रांना आणि व्यंगचित्रांना अधिक पसंती मिळते.

Web Title: 'Khwada' movie 'cartoons' publicity through

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.